'पुण्याचे मेट्रोमॅन' शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:17 PM2022-05-20T14:17:54+5:302022-05-20T14:32:52+5:30

भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही लिमये यांची ख्याती होती...

shashikant limaye passed away known as metroman of Pune dies of heart attack in pune | 'पुण्याचे मेट्रोमॅन' शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

'पुण्याचे मेट्रोमॅन' शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Next

पुणे : पुण्यात मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांच्या वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. लिमये यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडली होती. लिमये यांचे काल रात्री (गुरुवारी) पुण्यात निधन झाले. लिमये यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही लिमये यांची ख्याती होती.

गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घरी शशिकांत लिमये यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. महाराष्ट्रातील डोंगराळ भागात रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण कसे करता येईल, तसेच पुण्याभोवती लोहमार्गाचे विस्तारीकरण कसे असावे, याबाबतही आराखडे त्यांनी तयार केले होते. मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत दोन दिवसांपूर्वी महामेट्रोने घेतलेल्या बैठकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

शिक्षण आणि करिअर-

  • पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, फर्ग्युसन महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शशिकांत लिमये यांचे शिक्षण झाले.
  • मुंबई आयआयटीमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली.
  • नंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते भारतीय रेल्वेत दाखल झाले.
  • रेल्वेत विभागीय व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले. 
  • तीन खासगी कंपन्यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.
  • पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी २०१२ पासून ते आग्रही होते २०१४ मध्ये त्यांना महामेट्रोद्वारे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
  • पुणे आणि पिंपरीतील मेट्रोचा आराखडा तयार करण्यात लिमये यांची महत्त्वाची भूमिका 

Web Title: shashikant limaye passed away known as metroman of Pune dies of heart attack in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.