'पवारसाहेबांचे कर्तृत्व महान', देवेंद्र फडणवीस यांनी केले शरद पवारांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 04:40 PM2022-04-24T16:40:44+5:302022-04-24T16:40:54+5:30

कित्येक दिवसांनी पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर एकत्र आले

sharad pawar deeds are great devendra fadnavis praised sharad pawar | 'पवारसाहेबांचे कर्तृत्व महान', देवेंद्र फडणवीस यांनी केले शरद पवारांचे कौतुक

'पवारसाहेबांचे कर्तृत्व महान', देवेंद्र फडणवीस यांनी केले शरद पवारांचे कौतुक

Next

पुणे : पुण्यात एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांचा उद्योजक म्हणून सत्कार करण्यात आला. कित्येक दिवसांनी पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी सत्कार झाल्यावर फडणवीस यांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे भरभरून कौतुक केले. 

फडणवीस म्हणाले, कार्यक्रमात अशा राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगजक व्यक्तींचा माझ्या हस्ते सत्कार केला जातोय. याचा मला अभिमान वाटतो. राजकारणात अशी समृद्ध प्रक्रिया फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळते. पवारसाहेब, शिंदेसाहेब यांचे काम, कर्तुत्व महान असल्याचे म्हणत फडणवीस यांनी दोघांचे कौतुक केले. 

उपस्थितांची टाळया वाजवून दाद

फडणवीस आणि पवार खूप दिवसांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यातच फडणवीस यांच्या हस्ते पवारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर फडणवीस यांच्या तोंडून भरभरून कौतूक ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवून दादही दिली.  

Web Title: sharad pawar deeds are great devendra fadnavis praised sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.