ओतूर परिसरात सात नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:45+5:302021-04-14T04:11:45+5:30

आतापर्यंत १ हजार ५३ बरे झाले आहेत. ११० जणावर कोविड सेंटर तर १० जण घरीच उपचार घेत आहेत. ५२ ...

Seven new patients in Ootor area | ओतूर परिसरात सात नवे रुग्ण

ओतूर परिसरात सात नवे रुग्ण

Next

आतापर्यंत १ हजार ५३ बरे झाले आहेत. ११० जणावर कोविड सेंटर तर १० जण घरीच उपचार घेत आहेत. ५२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.

ओतूर शहरातील बाधितांची संख्या ६२५ झाली आहे. ५४१ बरे झाले आहेत. ५० जण कोविड सेंटर व ९ जण घरीच उपचार घेत आहेत. २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाचघर येथील बाधितांची संख्या १३ झाली आहे. १० जण बरे झाले आहेत. १ कोविड सेंटर तर १ घरीच उपचार घेत आहे.

आंबेगव्हाण येथील बाधितांची संख्या ११ झाली आहे, ७ बरे झाले आहेत, ३ जण उपचार घेत आहेत, एकाचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे येथील बाधितांची संख्या ८२ झाली आहे, ७२ बरे झाले आहेत, ८ जण कोव्हीड सेंटर, तर १ घरीच उपचार घेत आहे, एकाचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील बाधितांची संख्या ५७ झाली आहे, ३८ बरे झाले आहेत, १५ जणांवर उपचार सुरु आहेत ४ ,जणांचा मृत्यू झाला आहे, असे डॉ. सारोक्ते यांनी सांगितले ..

Web Title: Seven new patients in Ootor area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.