पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सात इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:37 PM2020-01-24T12:37:54+5:302020-01-24T12:42:16+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू केली..

Seven aspirants for the post of Leader of Opposition in Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सात इच्छुक

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सात इच्छुक

Next
ठळक मुद्देयेत्या २0२२ साली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार पक्ष बांधणीबरोबरच पालिकेमध्ये वचक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु

पुणे : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, एकूण सात नगरसेवक-नगरसेविकांनी या पदासाठी दावा केला आहे. यामध्ये चार नगरसेविकांचा समावेश आहे. 
राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर अजित पवार अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री झाले. २0१७पूर्वी पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. ही सत्ता भाजपने खेचून घेतल्यावर राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसावे लागले. पालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्याच्यादृष्टीने तसेच सत्ताधारी भाजपला रोखण्याकरिता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरुन लक्ष घातले जाऊ लागले आहे. नुकतीच अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पालिकेत बैठक घेऊन याची प्रचिती दिली आहे. येत्या २0२२ साली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने पक्ष बांधणीबरोबरच पालिकेमध्ये वचक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.
पवार यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यावर या पदावर वर्णी लावून घेण्याकरिता इच्छूकांकडून  ‘लॉबिंग’ सुरु करण्यात आले आहे. या पदाकरिता खडकवासला विधानसभा निवडणूक लढविलेले नगरसेवक सचिन दोडके इच्छुक असून याबाबत त्यांनी पवार यांची भेट घेतली आहे. यासोबतच नगरसेवक महेंद्र पठारे, योगेश ससाणे यांंनीही इच्छा दर्शविली आहे. यासोबतच माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, वैशाली बनकर, दीपाली धुमाळ या इच्छुक आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात ठेवून राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते पदाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. 
..........
पालिकेच्या विरोधी पक्षनेते बदलासोबतच शहराध्यक्ष पदामध्येही बदल केला जाण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष चेतन तुपे हे आमदार झाले असून, त्यांच्या नेतृत्वात पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली. शहराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप, प्रसन्न जगताप, नितीन कदम, प्रदीप देशमुख आदी इच्छुक आहेत. 

Web Title: Seven aspirants for the post of Leader of Opposition in Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.