‘सीरम’मध्ये दरमहा ६ कोटी डोस निर्मितीची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 06:38 AM2020-11-25T06:38:39+5:302020-11-25T06:38:50+5:30

कोरोनाशी लढाई, भारतासह अनेक देशांमध्ये  ३०० हून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहेत

‘Serum’ has the capacity to produce 60 million doses per month | ‘सीरम’मध्ये दरमहा ६ कोटी डोस निर्मितीची क्षमता

‘सीरम’मध्ये दरमहा ६ कोटी डोस निर्मितीची क्षमता

googlenewsNext
ठळक मुद्देभारतासह अनेक देशांमध्ये  ३०० हून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहेत

पुणे : जगात लसीच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविशिल्ड लसीचे ८ ते १० कोटी डोस जानेवारीअखेरपर्यंत ‘सीरम’कडून तयार केले जाऊ शकतात. त्यानंतर दरमहा ५ ते ६ कोटी डोस तयार करण्याची संस्थेची क्षमता आहे.  सध्या भारतात याच लसीची चाचणी अंतिम टप्प्यात असल्याने केंद्र सरकारचे लक्षही त्याकडे लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मह्त्त्वपूर्ण मानली जाते.

भारतासह अनेक देशांमध्ये  ३०० हून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यापैकी जवळपास ५० ते ६० लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्यातही १० ते १२ लसीच आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. तर कोविशिल्डसह अमेरिकेतील मॉडर्ना, फायझर आणि रशियातील स्पुटनिक या लसींच्या चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा कंपन्यांनी केला  आहे. यात चीननेही आघाडी घेतलेली आहे.  ‘सीरम’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी एका कार्यक्रमात बोलताना संस्थेकडून जानेवारीपर्यंत लसीचे ८ ते १० कोटी डोस तयार असतील, असे सांगितले होते. तसेच त्यानंतर प्रत्येक महिन्याला ५ ते ६  कोटी डोस तयार करण्याची  क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधानही भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा प्राथमिक कार्यक्रम आला असल्याने त्यांचे पुण्यात येणे निश्चित आहे. मात्र ते कधी येणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसल्याचे नाटेकर यांनी सांगितले.

शंभर देशांचे राजदूत ४ डिसेंबरला ‘सीरम’मध्ये 
पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युल्स’ कंपनीला शंभर देशांचे राजदूत ४ डिसेंबरला भेट देणार आहेत. सर्व राजदूत दोन गटांमध्ये दोन्ही ठिकाणी भेट देणार असल्याची अधिकृत माहिती जिल्ह्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

एअरफोर्सचे विमान 
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या दौऱ्यानुसार ४ डिसेंबरला दिल्लीतून एअर फोर्सच्या विमानाने ९८ देशांचे राजदूत लोहगाव विमानतळावर ४ डिसेंबरला सकाळी सव्वादहा वाजता दाखल होतील.

संस्थेकडून जानेवारीपर्यंत लसीचे 

८-१० 
कोटी डोस तयार असतील.

Web Title: ‘Serum’ has the capacity to produce 60 million doses per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.