लोणावळ्यात घरात चोरी करुन ज्येष्ठ महिलेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 07:00 PM2020-01-02T19:00:45+5:302020-01-02T19:04:23+5:30

हा अपघात नसून चोरी करुन केलेला खून असल्याचे प्राथमिक तपासात समोर

Senior women murdered after theft in the house at Lonavla | लोणावळ्यात घरात चोरी करुन ज्येष्ठ महिलेचा खून

लोणावळ्यात घरात चोरी करुन ज्येष्ठ महिलेचा खून

Next

लोणावळा : लोणावळ्यातील द्वारकामाई सोसायटीमध्ये आज दुपारच्या सुमारास एका ज्येष्ठ महिलेचा घरात चोरी करुन खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली. दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
    रेश्मा पुरुषोत्तम बनसल/अगरवाल (वय 70, रा. द्वारकामाई सोसायटी, लोणावळा) असे या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.
  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, द्वारकाईमाई सोसायटीमध्ये राहणार्‍या रेश्मा बन्सल ह्या आज सकाळी घरात एकट्याच होत्या. नित्य नियमांने त्या त्यांचे पती पुरुषोत्तम बनसल यांना दुपारी साडेबारा एक वाजता जेवणाचा डबा घेऊन दुकानावर जातात. आज त्या आल्या नाहीत म्हणून ते घरी आले असता दरवाजा बंद होता.

मागील बाजुच्या दरवाज्यातून ते आतमध्ये आले असता रेश्मा बन्सल ह्या घरातील त्यांच्या रुमच्या बाहेरील लाँबीमध्ये पडलेल्या होत्या. चक्कर येऊन पडल्या असाव्यात या अंदाजाने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र त्या मयत झाल्या होत्या. घरी आल्यानंतर रुममधील साहित्य इतरत्र पडलेले दिसल्यानंतर हा अपघात नसून चोरी करुन केलेला खून असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती समजताच लोणावळा  उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील व कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेचा व सोसायटी परिसरातील सर्व सिसीटिव्ही कँमेरे यांच्या फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Senior women murdered after theft in the house at Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.