डंपरने जेष्ठ नागरिक महिलेला चिरडले : विश्रांतवाडीतील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 08:32 PM2019-10-14T20:32:36+5:302019-10-14T20:34:44+5:30

रस्त्याच्या कडेला भंगार वेचणाऱ्या जेष्ठ नागरिक महिलेला कचऱ्याच्या डंपरने चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजता घडली...

senior citizen woman death in dumper accident : incident in Vishwantwadi | डंपरने जेष्ठ नागरिक महिलेला चिरडले : विश्रांतवाडीतील घटना  

डंपरने जेष्ठ नागरिक महिलेला चिरडले : विश्रांतवाडीतील घटना  

googlenewsNext

विमाननगर : रस्त्याच्या कडेला भंगार वेचणाऱ्या जेष्ठ नागरिक महिलेला कचऱ्याच्या डंपरने चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजता घडली. या अपघातात सोजरबाई गोपीनाथ राऊत (वय 75 ,रा.भिमनगर, विश्रांतवाडी) जेष्ठ नागरिक महिलेचा उपचारापुर्वीच म्रुत्यू झाला. याप्रकरणी डंपरचालक युनूस जमाल शेख (वय  41, रा.यशवंत नगर,येरवडा) याला विश्रांतवाडीपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कस्तुरबा सोसायटी समोरील रस्त्यावर एका जेष्ठ नागरिक महिलेला डंपरने धडक दिल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती.विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी जेष्ठ नागरिक महिलेला रूग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी डंपरचालक युनूस शेख याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: senior citizen woman death in dumper accident : incident in Vishwantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.