पुनर्वसन झाल्याशिवाय शिक्के काढू देणार नाही; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 08:52 PM2020-01-09T20:52:16+5:302020-01-09T21:00:45+5:30

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनचा प्रश्न ३१ वर्षांपासून प्रलंबित

seals Will not remove than unless rehabilitated; give signal by bhama askhed affected citizen | पुनर्वसन झाल्याशिवाय शिक्के काढू देणार नाही; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा इशारा

पुनर्वसन झाल्याशिवाय शिक्के काढू देणार नाही; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देभामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा इशारा : तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारापाचशेच्या वर धरणग्रस्त पॅकेजचे पैसे मिळण्याच्या रांगेत ६ महिन्यांपासून उभे

पाईट : भामा-आसखेड धरणग्रस्तांचे जोपर्यंत पुनर्वसन होत नोही, तोपर्यंत लाभक्षेत्रामध्ये संपादित केलेल्या जमिनीवरील शिक्के काढण्यास भामा-आसखेड धरणामध्ये बाधित झालेल्या धरणग्रस्त शेतकºयांनी विरोध दर्शविला आहे. तसा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे. 
भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनचा प्रश्न ३१ वर्षांपासून प्रलंबित आहे. यामध्ये पात्र १११ शेतकऱ्यांचे काहीअंशी पुनर्वसन झाले आहे; परंतु, कोर्टाने पुनर्वसनाचे आदेश दिलेल्या ५६४ पैकी अवघ्या ७० धरणग्रस्तांचे ७/१२ उतारे तयार झाले आहेत. यामुळे त्यांचा ताबा बाकी असून इतर ४९४ धरणग्रस्त जमीन मिळण्याचा प्रतीक्षेत आहेत.  शासनाने अपात्र ठरविलेल्या ३१५ धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पॅकेजचा मार्ग स्वीकारला. यामध्ये पाचशेच्या वर धरणग्रस्त पॅकेजचे पैसे मिळण्याच्या रांगेत ६ महिन्यांपासून उभे आहेत. अशा परिस्थितीत धरणग्रस्तच्यिंा सर्व मागण्या पूर्ण करण्याची भामा-आसखेड धरणग्रस्त सातत्याने मागणी करीत असून शासनाकडून मात्र कासव गतीने काम चालू आहे. या सर्व गोष्टी होत असल्या तरी, दरम्यान शासनाने पाण्याचे प्रयोजन बदलले. पाणी पुणे महापालिकेला विकले. त्यासाठीची सर्व कामे अती जलदगतीने सुरू आहेत. पाण्याचे प्रयोजन बदलले म्हणून लाभक्षेत्रातील शेतकरी जमिनीवरील शिक्के काढण्याची मागणी करीत आहेत. ‘आम्ही आमच्या जमिनी दिल्या. आम्ही बेघर, भूमिहीन झालो. आमचा विचार कोण करणार?’ असा सवाल धरणग्रस्तांनी विचारला आहे. 
पाण्याचे प्रयोजन बदलण्यामध्ये धरणग्रस्त शेतकºयांचे कोणतेही हित नसून प्रयोजन बदलले तर लाभक्षेत्र बदलून त्या भागात आमचे पुनर्वसन करा. काहीही करा; पण प्रथम आमचे पुनर्वसन करा, अशी धरणग्रस्त शेतकºयांची मागणी आहे. यासोबतच राहिलेल्या सर्व शेतकºयांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय जमिनीवरील शिक्के काढण्यास धरणग्रस्तांचा विरोध राहील.
...........
याबाबत भामा-आसखेड धरणग्रस्त आंदोलनातील प्रमुख सत्यवान नवले म्हणाले, ‘‘जोपर्यंत भामा-आसखेड धरणात बाधित झालेल्या शेवटच्या शेतकºयाचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत धरणग्रस्तांसाठी संपादित झालेल्या जमिनीवरील शिक्के काढण्यास धरणग्रस्तांचा तीव्र विरोध असेल. त्यासाठी शासनाने तत्काळ पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करावी.’’
....................

धरणग्रस्तांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना जमिनीचा मोबदला रोख स्वरूपात पाहिजे, तर काहींना जमिनी हव्या आहेत. यामध्ये भामा-आसखेड धरणाच्या पाण्याचे प्रयोजन बदलले असून ज्या भागात पाणी मिळत नाही, तेथील जमिनी मागून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. चासकमान धरणातील लाभक्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र शिल्लक आहे. शिवाय, भामा-आसखेडच्या नदीपात्रातून शिरूर तालुक्याला जेथे पाणी मिळत आहे, अशा भागात प्रस्ताव भरून दिल्यास कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेऊन प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करू.-आमदार, दिलीप मोहिते 

Web Title: seals Will not remove than unless rehabilitated; give signal by bhama askhed affected citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.