अकरावीसाठी २१ ऑगस्टला सीईटी; वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:43 AM2021-07-20T04:43:48+5:302021-07-20T04:44:13+5:30

राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे.

schedule announced for cet on august 21 for the eleventh | अकरावीसाठी २१ ऑगस्टला सीईटी; वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार

अकरावीसाठी २१ ऑगस्टला सीईटी; वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना सीईटीसाठी २० जुलै ते २६ जुलै या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. तर सीईटी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतली जाणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम असेल याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, इंग्रजी, गणित (भाग १ व २), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग १ व २ ) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विषयनिहाय २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी १७८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सीईटी परीक्षा ‘ओएमआर शीट’च्या माध्यमातून घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक परीक्षा केंद्र देण्यात जाईल. विद्यार्थ्याने अर्जात नमूद केलेला पत्ता विचारात घेऊन परीक्षा केंद्र दिले जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना माध्यम निवडणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

सीईटीच्या नावाखाली नफेखोरी

राज्य मंडळाने अकरावी ‘सीईटी’साठीचे विषय घटक सोमवारी प्रसिध्द केले. परंतु, काही दिवसांपूर्वीच याच घटकांवरील आधारित सीईटीच्या तयारीचे पुस्तक बाजारात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यापूर्वीच विषय घटकांची माहिती प्रकाशकांपर्यंत पोहचविण्याचे काम या प्रक्रियेत काम करणाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे कोरोना काळात सीईटीच्या नावाखाली नफेखोरी करणाऱ्यांवर कारवाई होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: schedule announced for cet on august 21 for the eleventh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.