राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' पुरस्कार जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 01:49 PM2021-03-17T13:49:03+5:302021-03-17T13:51:09+5:30

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाऊंडेशनतर्फे 'संसद महारत्न' पुरस्कार देण्यात येतो. 

'Sansad Maharatna' award declare to NCP MP Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' पुरस्कार जाहीर 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' पुरस्कार जाहीर 

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त आणि निवृत्त न्यायमूर्तींच्या उपस्थितीत शनिवारी वितरण

बारामती: चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझिनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी (दि. २०) प्रदान करण्यात येणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा सोहळा होणार आहे. 

संसद महारात्न पुरस्काराबरोबरच सुप्रिया सुळे यांना विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी सलग सहाव्यांदा जाहीर झालेला संसदरत्न पुरस्कारही याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. 

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे.  सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फाउंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

याबरोबरच चालू सतराव्या लोकसभेतही सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून त्यांनी ८९ टक्के उपस्थिती लावत १२२ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण २८६ प्रश्न त्यांनी विचारले असून चार खासगी विधेयके मांडली आहेत.या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: 'Sansad Maharatna' award declare to NCP MP Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.