Sadguru Shankar Maharaj's 73rd Samadhi ceremony celebrated in an innovative way on the due to Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्गुरू शंकर महाराजांचा ७३ वा समाधी सोहळा अभिनव पद्धतीने साजरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्गुरू शंकर महाराजांचा ७३ वा समाधी सोहळा अभिनव पद्धतीने साजरा

ठळक मुद्देऑनलाईन पूजा, अभिषेक, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत, गरजूंना महाअन्नदान

पुणे : धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज मठ म्हणजे देशाविदेशातील लाखो शंकर महाराज भक्तांचे अढळ श्रद्धास्थान आहे. श्री सदगुरू संतवर्य शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी  एप्रिल , मे दरम्यान साजरा केला जाणारा सद्गुरू शंकर महाराज समाधी सोहळा म्हणजे भक्तांसाठी मोठ्या आनंदाची पर्वणी असते. यंदा मठातर्फे सद्गुरू शंकर महाराजांचा ७३ वा समाधी सोहोळा २४ एप्रिल ते २ मे दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊन लक्षात घेऊन समाधी ट्रस्टच्या वतीने हा सोहळा अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आल्यामुळे तो सर्वत्र चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला.

श्री सदगुरू संतवर्य शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने  मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) या निधीस रू १० लाखांचे अर्थ साहाय्य करण्यात आले.तसेच ससून हॉस्पीटल देणगी समितीस आौषधे व साधन सामुग्री करीता रू ५ लाख देण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार श्री शंकर महाराज समाधी मंदिर (मठ), ७३ व्या समाधी सोहळ्याच्या काळात सुद्धा बंद ठेवण्यात आले. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे मठाच्या विश्वस्तांनी काटेकोरपणे पालन केले. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य भक्तांसोबतच महापौर, आमदार, नगरसेवक, पोलीस  व प्रशासकीय अधिकारी अशा पदाधिकारी भक्तांनी देखील शंकर महाराजांचे दर्शन, मठाच्या दरवाजा बाहेरूनच  घेऊन विश्वस्तांना सहकार्य केले. तसेच दर्शनासाठी दरवाजा उघडावा, म्हणून मठाच्या सिक्युरिटी कर्मचा?्यांना कोणताही त्रास दिला नाही. 
दर्शनासाठी मठाच्या दारात आलेला भक्त उपाशी राहता कामा नये, अशी शंकर महाराजांची ईच्छा असल्याने मठातर्फे दररोज खिचडीचा प्रसाद आणि सोहळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते.  कोरोनाच्या पाश्रर््वभूमीवर यंदा ७३ व्या समाधी सोहळ्यानिमित्त  विद्यार्थी, बेरोजगार मजुर, गरीब कुटुंबे अशा हजारो  वंचितांना खिचडीच्या प्रसादचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भक्तांनी अन्नदानासाठी ?ानलाईन देणग्या देऊन आर्थिक साहय्य केलं.
भक्तांना समाधी सोहळा सप्ताहात दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून विश्वस्तांकडून अभिनव पद्धतीचा अवलंब करण्यात आला. फेसबुक व व्हॅट्सअपवर दररोजच्या पुजेचे तसेच मठाच्या परिसरातील फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आले. त्यामुळे समाधी मंदिर बंद असले, तरीही  भक्तांना निर्विघ्नपणे  शंकर महाराजांचे दर्शन घेणे शक्य झाले. त्यामुळे जणू महाराज आपल्या सोबत आहेत, याची प्रचीती भक्तांना आली. यावेळी मठातील धार्मिक विधी व पारंपारीक शोडषोपचार, प्रतिकात्मक रीतीने पार पाडण्यात आले. यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचार्यांनी पुजा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी  खूप मेहनत घेतली.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इंटरनेटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ११ गुरुजींनी घरूनच रुद्र पठण करुन लघुरुद्र अभिषेक केला व  आधुनिक संकल्पना स्विकारण्यात मठ, मंदिरेही मागे नाहीत हे दाखवून दिले. भक्तांनी आपापल्या घरी महाराजांची पूजा, नैवेद्य, पारायण, भजन करून हा सोहळा साजरा केला आणि त्याचे फोटो व्हिडीओ अपलोड केले.

अशाप्रकारे  सामाजिक भान ठेवून सोहळा पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल विश्वस्तांनी सर्व भक्तांचे आभार मानले. तसेच कोरोनाचे  संकट लवकरात लवकर दूर होऊन भक्तांना श्रींच्या समाधीचे दर्शन घडावे, अशी सद्गुरु शंकर महाराज चरणी प्रार्थना केली. करोनाच्या पाश्रर््वभूमीवर लॉकडाऊन संपेपर्यंत मठात शिधा, देणगी स्विकारण्यात येणार नसल्याने  भक्तांनी समाधी परिसरात येवू नये; पोलीस, सिक्युरिटी, व्यवस्थापन कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट, पुणे च्या विश्वस्तांनी केले आहे. या वेळी  अध्यक्ष भगवान खेडेकर , सचिव सुरेंद्र वाईकर, विश्वस्त चंद्रकांत मालपाणी, सुरेश येनपुरे, सदानंद खामकर, नागराज नायडू, प्रताप भोसले उपस्थित होते.
-------------

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sadguru Shankar Maharaj's 73rd Samadhi ceremony celebrated in an innovative way on the due to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.