माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या मुलाला गुन्हे शाखेकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 10:05 PM2021-07-01T22:05:47+5:302021-07-01T22:06:21+5:30

पत्नी संगीता बर्‍हाटे, पिंताबर धिवार यांना ५ दिवस पोलीस कोठडी

RTI activist Ravindra Barhate's son arrested by crime branch | माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या मुलाला गुन्हे शाखेकडून अटक

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या मुलाला गुन्हे शाखेकडून अटक

Next

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे याच्या पत्नीपाठोपाठ गुन्हे शाखेने त्याचा मुलगा मयुर रवीद्र बर्‍हाटे (वय २१, रा. धनकवडी) याला आज रात्री उशिरा अटक केली आहे. दरम्यान, काल अटक केलल्या बर्‍हाटे याची पत्नी संगीता बर्‍हाटे आणि पिंताबर धिवार यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे पुरावे गुन्हे शाखेच्या पथकाला हाती लागल्यानंतर गुरुवारी मयुर बर्‍हाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात त्याला आणून चौकशी करण्यात आली. त्यात त्याचा सहभाग आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. 
रवींद्र बर्‍हाटे हा गेल्या दीड वर्षांपासून फरार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ बनविण्यासाठी मदत केल्याचे व त्याच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेने बुधवारी पिंताबर धिवार याला अटक केली होती. तसेच गुन्ह्यात सहकार्य केल्याने व त्याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने बर्‍हाटे यांची पत्नी संगीता बर्‍हाटे हिलाही अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांची ५ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Web Title: RTI activist Ravindra Barhate's son arrested by crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.