महिलेकडून साडेसहा लाखांचे अमली पदार्थ जप्त; कोंढव्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:24 PM2021-03-29T16:24:26+5:302021-03-29T16:24:40+5:30

२१ किलो गांजासह चरस जप्त...

Rs 6.5 lakh worth of drugs seized from woman; Action in Kondhwa | महिलेकडून साडेसहा लाखांचे अमली पदार्थ जप्त; कोंढव्यात कारवाई

महिलेकडून साडेसहा लाखांचे अमली पदार्थ जप्त; कोंढव्यात कारवाई

Next

पुणे : कोंढवा भागात गांजा, चरस अशा अमली पदार्थांची विक्री करणार्‍या महिलेला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. 
समीना मेहमुद शेख (वय ३५, रा. भागोदयनगर, कोंढवा) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून २१ किलो गांजा, चरस तसेच मोबाईल असा ६ लाख ५७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

पोलीस नाईक मनोज साळुंके यांना शेख घरातून अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर पोलिसांनी शेख हिच्या घरावर छापा घालून तेथून २१ किलो गांजा, ५६९ गॅ्रम चरस, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण शिर्के, सुजीत वाडेकर, मारूती पारधी, विशाल दळवी, रेहाना शेख आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Rs 6.5 lakh worth of drugs seized from woman; Action in Kondhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.