रोहित पवार यांची सामाजिक बांधिलकी; कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या १६ जिल्ह्यात सॅनिटायझर वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 04:13 PM2020-04-07T16:13:15+5:302020-04-07T16:13:56+5:30

वर्क फ्रॉम होम ची पध्दत अवलंबत राज्यातील विविध आरोग्य केंद्रे, पोलिस आयुक्तालये यांच्याशी संपर्क

Rohit Pawar's social commitment; Sanitizer distribution in Corona's most affluent district | रोहित पवार यांची सामाजिक बांधिलकी; कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या १६ जिल्ह्यात सॅनिटायझर वाटप

रोहित पवार यांची सामाजिक बांधिलकी; कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या १६ जिल्ह्यात सॅनिटायझर वाटप

Next
ठळक मुद्देअहमदनगर, बीड, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूरसह १६ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश

बारामती : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून घरून राज्यातील विविध आरोग्य केंद्रे, पोलिस आयुक्तालये यांच्याशी संपर्क साधत आहे. आता त्यांनी कोरोनाविरुध्दच्या लढाईत सामाजिक बांधिलकी जपत या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यात तब्बल २० हजार लिटर सॅनिटायझरचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये राज्यातील मुंबई,पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूरसह १६ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. 
ससून, नायडू रुग्णालयासह पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरातही याचे वितरण करण्यात आले आहे. रोहित पवार यांनी जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असतानाच सॅनिटायझरचा व मास्कचा तुटवडा असल्याची माहिती लक्षात घेऊन त्यांनी घरातूनच राज्यभरातील युवकांशी संपर्क व संवाद साधत उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या वर्क फ्रॉम होम ची पध्दत आदर्श घ्यावा,अशीच आहे.आमदार पवार, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडच्या मदतीने राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधे २० हजार लिटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील पोलिस यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग यंत्रणेतील अधिकारी,कर्मचारी, महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच  त्या भागातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे,आरोग्य उपकेंद्रे यांच्या वापरासाठी हे सॅनिटायझर पाठवण्यात येत आहे.
--------
...ससून व नायडूला ही मदत
याखेरीज पुण्यात ससून व नायडू संसर्गजन्य विकार उपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधक चष्मेही वितरीत करण्यात आले आहेत.

Web Title: Rohit Pawar's social commitment; Sanitizer distribution in Corona's most affluent district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.