पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी रिपाईच्या सुनीता वाडेकर यांचा विजय; महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 09:57 PM2021-04-06T21:57:44+5:302021-04-06T21:58:27+5:30

पुणे पालिकेत बहुमताने सत्तेवर आल्यानंतर भाजपकडून रिपाईला उपमहापौर पदाचा शब्द देण्यात आला होता.

Ripai's Sunita Wadekar's victory as Deputy Mayor of Pune Municipal Corporation; Defeat of Mahavikas Aghadi candidate | पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी रिपाईच्या सुनीता वाडेकर यांचा विजय; महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव

पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी रिपाईच्या सुनीता वाडेकर यांचा विजय; महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव

googlenewsNext

पुणे : पुणे महापालिकेच्या उपमहापौर पदी भाजप व रिपाई संयुक्त आघाडीच्या उमेदवार सुनीता वाडेकर यांनी महाविकास आघाडीच्या लता राजगुरू यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत  वाडेकर यांना ९७ तर राजगुरू यांना ६१ मते प्राप्त झाली आहे. 

पुणे पालिकेत बहुमताने सत्तेवर आल्यानंतर भाजपकडून रिपाईला उपमहापौर पदाचा शब्द देण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये भाजपने उपमहापौर म्हणून सरस्वती शेंडगे यांना संधी दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असल्याने वाडेकर यांचा विजय निश्चित होता. मंगळवारी या निवडणुक पार पडली. 

पुणे महापालिकेत सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपने मित्र पक्ष रिपाईला उपमहापौर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रिपाईच्या गटनेत्या वाडेकर यांना संधी देण्यात आली होती. मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने मतदान घेत निवडणूक पार पडली. अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. 

महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, भाजपने पुणे महापालिकेत सहयोगी पक्ष म्हणून कार्यरत असलेल्या रिपाईला उपमहापौर पदाचा शब्द दिला होता.त्या शब्दाची पूर्तता करत सुनीता वाडेकर यांना ही संधी दिली आहे.

Web Title: Ripai's Sunita Wadekar's victory as Deputy Mayor of Pune Municipal Corporation; Defeat of Mahavikas Aghadi candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.