बारामतीत लॉकडाऊनमध्ये शिथीलता! किराणा, भाजीपाल्याची दुकाने सकाळी ११ पर्यंत राहणार खुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:03 PM2021-05-18T15:03:26+5:302021-05-18T15:11:18+5:30

१९ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार, प्रशासनाचा निर्णय

Relaxation in lockdown in Baramati! Grocery and vegetable shops will remain open till 11 am | बारामतीत लॉकडाऊनमध्ये शिथीलता! किराणा, भाजीपाल्याची दुकाने सकाळी ११ पर्यंत राहणार खुली

बारामतीत लॉकडाऊनमध्ये शिथीलता! किराणा, भाजीपाल्याची दुकाने सकाळी ११ पर्यंत राहणार खुली

Next
ठळक मुद्देहॉटेल पार्सल सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरु राहणार

बारामती: बारामती शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली आहे. मंगळवारी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आदेश जाहीर केला. त्यानुसार आता बुधवार पासून किराणा, भाजीपाला फळे दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

१९ मे पासून  या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये दवाखाने व औषध दुकाने पूर्वीप्रमाणेच २४ तास खुुली राहतील. तर सकाळी ७ ते ११ दरम्यान, फळे  व भाजीपाला, गॅस वितरण, दूध वितरण, मान्सूनपूर्व कामे, पाणीपुरवठा कामे, कृषि व कृषि सलग्न व्यवसाय पशुखाद्य दुकाने सुरु राहणार असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच हॉटेल पार्सल सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरु राहणार आहे. शिवाय गेल्या १४ दिवसांपासून बंद असलेले बँकेचे कामकाज पुर्ववत होणार आहे. अन्य व्यवसाय मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान,शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात घटण्यास सुरवात झाली आहे. सरासरी ३५० ते ४०० प्रतिदिन आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या आता २०० ते २५० दरम्यान पोहचली आहे. आजअखेर शहर तालुक्यात एकूण २२ हजार ५०१ रुग्ण आढळले आहेत. तर १८ हजार ९९९ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात शहर आणि तालुक्यात २०९ रुग्ण आढळले आहेत. यात शहर ८२, ग्रामीण १२७ रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.

Web Title: Relaxation in lockdown in Baramati! Grocery and vegetable shops will remain open till 11 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.