मराठवाड्यात प्रतिगामी शक्ती वाढत आहेत : विश्वंभर चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:56 AM2019-09-19T11:56:02+5:302019-09-19T11:59:33+5:30

सध्या मराठवाड्यात सिमी आणि त्याचबरोबर सनातन यांचा प्रभाव वाढत आहे..

The regressive powers are increasing in Marathwada: vishambhar Chaudhary | मराठवाड्यात प्रतिगामी शक्ती वाढत आहेत : विश्वंभर चौधरी

मराठवाड्यात प्रतिगामी शक्ती वाढत आहेत : विश्वंभर चौधरी

googlenewsNext
ठळक मुद्दे'मराठवाडा रत्न पुरस्कार' प्रदान समारंभ जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव मराठवाड्यात

पुणे : मराठवाडा मुक्ती संग्राम हा लढा निजामाच्या हुकूमशाही विरोधातला लढा होता.त्याला हिंदु, मुस्लिम हा रंग देता कामा नये. सध्या मराठवाड्यात सिमी आणि त्याचबरोबर सनातन यांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे येथे प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. हे मराठवड्यासाठी फार धोका दायक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी वक्त केले. मराठवाडा सेवक प्रतिष्ठान'तर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी  माजी खासदार रवी गायकवाड, धमार्दाय सह-आयुक्त दिलीप देशमुख, माजी पोलिस महानिरीक्षक (कारागृह) विठ्ठल जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समनव्यक यशवंत मानखेडकर आणि योगीराज वेणीमाधव गोसावी (पैठणकर), प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी  उपस्थित होते.
मराठवाडा सेवक प्रतिष्ठान'तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'मराठवाडा रत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.  नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले (कला), प्रल्हाद गुरव (वैद्यकीय), दीपक नागरगोजे (सामाजिक), प्रभाकर निलेगावकर (नाट्य), श्रीकांत जाधव (बँकिंग), अमित माने (कृषी), राजेंद्र हुंजे (पत्रकारिता) आणि स्वराज सरकटे (गायन) यांचा गौरव केला. 
चौधरी म्हणाले की, मराठवाडा स्वतंत्र झाला, त्यामध्ये सरदार पटेल यांचे जेवढे श्रेय आहे तेवढेच श्रेय पंडित नेहरू यांचे देखील आहे, कारण हा समूहिक मंत्रिमंडळाचा निर्णय होता.   मराठवाड्यातील लोक रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत. मराठवाड्यात माती आणि माणुस दुभंगल्या जात आहे. जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव मराठवाड्यात दिसून येत आहे. मराठवाड्यातील अनेक मंडळी आज उत्तम प्रकारे सर्वच क्षेत्रात काम करुन  समाज सेवा देखील करत आहेत. 
दिलीप देशमुख म्हणाले, मराठवाड़ा मुक्ति संग्राम हा हैदराबाद मुक्ति संग्राम नावाने ओळखला जातो. संघर्ष हाच मराठवाडयाच्या पाचविला पूजलेला आहे. ह्या संघषार्तूनच मराठवाड्यातील माणूस तयार प प्रत्येक क्षेत्रात त्याने उत्तम कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील परिस्तिथी सवार्ना माहिती असून अतिशय प्रतिकूल परिस्तिथीमुळे इथला तरुण वर्ग प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झेप घेत आहे. त्यामुळे हा संघर्ष इथेच थांबवू नका आज मराठवाड्याची जी परिस्तिथि आहे, जे प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी आणखी संघर्ष करायचा आहे. त्यामुळे आपल्या नोकरी, व्यवसायात स्थिर राहून मराठवाड्यासाठी काही करता येईल का ? याबाबतीत विचार करणे गरजेचे आहे. आपले गाव, तालुका, जिल्ह्यासाठी काही करता येईल का याचा विचार देखील केला पाहिजे.
.............
मुक्त झाल्याचे काही लोकांना आवडले नाही
योगीराज महाराज गोसावी म्हणाले, मराठवाडा निजामाच्या हुकूमशाहीतुन मुक्त झाला, हे काही लोकांना आवडल नाही. म्हणून काही लोक मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमाला अनुपस्थित राहतात. मराठवाड्यातील नागरिकांची भारतात राहण्याची इच्छा होती. त्यासाठी सर्वांची लढा दिला.

Web Title: The regressive powers are increasing in Marathwada: vishambhar Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.