Ramjan Eid : मुस्लिम बांधवांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद साधेपणाने साजरी करा; जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:51 PM2021-05-13T18:51:19+5:302021-05-13T18:52:17+5:30

मुस्लिम बांधवांनो, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नवीन आदेश, जाणून घ्या काय आहेत...

Ramjan Eid: Muslim brothers, celebrate Ramadan Eid simply on the backdrop of Corona; New order from district administration | Ramjan Eid : मुस्लिम बांधवांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद साधेपणाने साजरी करा; जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश

Ramjan Eid : मुस्लिम बांधवांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद साधेपणाने साजरी करा; जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश

googlenewsNext

पुणे: पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी देखील पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे. याच दरम्यान, उद्या मुस्लिम बांधवांची रमजान ईद साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.तिचे पालन करणे मुस्लिमबांधवांना बंधनकारक असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. 

दरवर्षी मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. एकत्रित येत नमाजपठण करून हे बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात.  मात्र, कोरोना संकटांमुळे सर्वच सण, उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे रमजान ईद सार्वजनिक रित्या साजरी न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यलयाकडून करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होता.


* कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज पठण आणि इफ्तारसाठी मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. 
  सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरातच साधेपणाने साजरे करावेत.
* राज्यात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.
* ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये.
* धार्मिक स्थळ बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी 
  करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.
* रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच मास्क सॅनिटायजरचा वापर करावा.

Web Title: Ramjan Eid: Muslim brothers, celebrate Ramadan Eid simply on the backdrop of Corona; New order from district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.