सुप्रसिद्ध 'बुधानी वेफर्स' चे मालक राजुशेठ बुधानी यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:46 PM2021-04-06T12:46:10+5:302021-04-06T12:47:12+5:30

सर्व पुणेकरांना 'वेफर्स' च्या स्वादाची भुरळ घालणारे बुधानी ब्रदर्स ही पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात बटाटा वेफर्स साठी प्रसिद्ध आहे.

Rajusheth Budhani owner of famous 'Budhani Wafers' passed away | सुप्रसिद्ध 'बुधानी वेफर्स' चे मालक राजुशेठ बुधानी यांचे पुण्यात निधन

सुप्रसिद्ध 'बुधानी वेफर्स' चे मालक राजुशेठ बुधानी यांचे पुण्यात निधन

googlenewsNext

पुणे/ लष्कर: पुण्यातील सुप्रसिद्ध बटाटा वेफर्स चे मालक राजुशेठ चमनशेठ बुधानी यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी मंगळवारी जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन भाऊ असा परिवार आहे.

सर्व पुणेकरांना 'वेफर्स' च्या स्वादाची भुरळ घालणारे बुधानी ब्रदर्स ही पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात बटाटा वेफर्स साठी प्रसिद्ध आहे. याचा वेफर्स च्या मालाला परदेशातूनही मोठी मागणी आहे. राजु यांचे मोठे चुलते असणारे बाबू वय ९० वर्ष यांनाही ५५ वर्षांपूर्वी एम जी रोड वरील पुना ड्रग्स स्टोअर च्या बोळीत असणाऱ्या एक लहानश्या दुकानात बटाटा वेफर्स विकण्याचा हा व्यवसाय सुरू केला होता. त्याकाळी या लहानशा दुकानाच्या खिडकीतून ग्राहकांना आपला माल विकत असत. 
बुधानी ब्रदर्सचे वेफर्स संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतात प्रसिद्ध आहेत. हा व्यवसाय दिवंगत राजु बुधानी यांनी मोठ्या प्रमाणात वाढवला. सध्या एमजी रस्त्यावर तीन मजली इमारतीत अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून मोठ्या प्रमाणावर वेफर्स आणि बटाट्याच्या इतर खाद्यप्रकाराची निर्मिती केली जाते. बटाटा वेफर्स चे १० वरून अधिक प्रकार उपलब्ध आहे. 

बुधानी यांचे बाल मित्र इमाद भाई सय्यद म्हणाले,बुधानी हे गोर गरीब लोकांना नेहमी मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. ताबूत स्ट्रीट वरील ताबूत स्ट्रीट ताजिया कमिटी, व ताबूत स्ट्रीट तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले.

Web Title: Rajusheth Budhani owner of famous 'Budhani Wafers' passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.