पुणे महापालिका आयुक्तांच्या समोरच दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी; तळजाई येथील वादग्रस्त प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 07:06 PM2020-07-02T19:06:21+5:302020-07-02T19:06:59+5:30

पालकमंत्र्यांच्या सूचनेवरुन आयुक्तांनी बोलावली होती बैठक

Quarrel between two senior corporators before the commissioner in pune | पुणे महापालिका आयुक्तांच्या समोरच दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी; तळजाई येथील वादग्रस्त प्रकल्प

पुणे महापालिका आयुक्तांच्या समोरच दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी; तळजाई येथील वादग्रस्त प्रकल्प

Next
ठळक मुद्देतळजाई टेकडीवर १०८ एकरांमध्ये ‘ऑक्सिजन पार्क’उभारण्यात येणार

पुणे : तळजाई टेकडीवर पार्किंग शेड उभारुन त्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याविषयासंदर्भात पालकमंत्र्यांच्या सूचनेवरुन पालिका आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये दोन ज्येष्ठ नगरसेवक एकमेकांना भिडले. एकमेकांना ढोंगी, सोंगी, बदमाश, चोर म्हणण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. हमरीतुमरीवर आलेल्या दोघांनाही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मध्ये पडत शांत करण्याच्या प्रयत्न केला. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आयुक्तांच्या कक्षातच हा प्रकार घडला. या विषयाची चर्चा दिवसभर महापालिकेत रंगली होती.
तळजाई टेकडीवर १०८ एकरांमध्ये ‘ऑक्सिजन पार्क’ (वन उद्यान) उभारण्यात येणार असून त्यातील काही क्षेत्रावर पार्किंगशेड उभारुन त्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र याठिकाणी वनउद्यानाचे आरक्षण असल्यामुळे याठिकाणचा सौरऊर्जा प्रकल्प शक्य नसल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. ग्रेसचे नवनियुक्त गटनेते आबा बागूल यांनी याविषयी गेल्या आठवड्यात पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन याविषयाची माहिती दिली. त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप तेथे उपस्थित होते. पवार यांनी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यावर पालिका आयुक्तांना स्थानिक आमदार, सर्व नगरसेवक यांची एकत्र बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. आयुक्त यांनी बागूल व जगताप यांना याविषयावर चर्चा करण्याकरिता कार्यालयात बोलाविले होते.
चर्चा सुरु असताना याविषयावरुन वादाची ठिणगी पडली. बागूल यांनी हा प्रकल्प करणे कसे आवश्यक आहे हे सांगत बजेटमध्ये तरतूद करण्याची मागणी केली. तर, जगताप यांनी त्यांचे मुद्दे खोडून काढत या प्रकल्पाला मान्यता नाही. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प योग्य नसून हिलटॉप, हिलस्लोप आणि पार्क संदभार्तील निर्णय शासन दरबारी प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. प्लॉटधारकांनी पालिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आणि नुकत्याच पालिकेच्या बाजुने लागलेल्या निकालाचा संदर्भही जगताप यांनी दिली. हा वाद सुरु असताना बागूल यांनी आम्ही निवडून आलेलो नगरसेवक असून स्विकृत नाही अशी टिपण्णी केली. त्यावरुन,  जगताप यांनी बागूल यांनी कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या 15 प्रकल्पांपैकी 13 प्रकल्प बंद असल्याचे म्हटले. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. एकमेकांना अरे-तुरे वरुन बोलताना एक दम  वाद पेटला. एकमेकांना ढोंगी, सोंगी, चोर, बदमाश असे संबोधण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. यावेळी काही अधिकारीही तेथे उपस्थित होते. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पालिका आयुक्तांनी दोघांच्या मध्ये पडत हा वाद शांत केला. 

Web Title: Quarrel between two senior corporators before the commissioner in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.