वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेची'बंपर'ऑफर! पण त्यामागं 'हे' वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 04:09 PM2021-04-19T16:09:59+5:302021-04-19T17:53:16+5:30

देशभरातील कर्नाटक, केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या विविध राज्यातील वृत्तपत्रांद्वारे ३० चिकित्सक आणि १०० डॉक्टरांच्या भरतीची जाहिरात

Pune Zilla Parishad's 'Bumper' offer for young people who want to work in the medical field | वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेची'बंपर'ऑफर! पण त्यामागं 'हे' वास्तव

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेची'बंपर'ऑफर! पण त्यामागं 'हे' वास्तव

googlenewsNext

पुणे: पुण्यात कोरोना संकटाने थैमान घातले आहे. दिवसागणिक वाढत चाललेल्या कोरोना ग्रस्तांच्या मोठ्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा देखील कोलमडत चालली आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय उपचार यंत्रणेची आणखी दयनीय अवस्था आहे. याच पार्श्वभूमीवर पुणेजिल्हा परिषदेनेवैद्यकीय क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरीची ही 'बंपर'ऑफर दिली आहे. मात्र, ही 'ऑफर' देण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. त्या पाठीमागं भयाण वास्तव कारणीभूत आहे.

पुणे जिल्हा परिषदेकडून कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर चांगला दिला जात आहे. त्याच धर्तीवर परिषदेने कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार तब्बल १ कोटी ९७ लाख दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या पगाराव्यतिरिक्त ही रक्कम अनुक्रमे चिकित्सक आणि डॉक्टरांना दरमहा ७५ आणि ३० हजार प्रति महिना देण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेने तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, केरळ, नवी दिल्ली, ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब, आणि उत्तर प्रदेश या राज्यातील वृत्तपत्रात ३० चिकित्सक आणि १०० डॉक्टरांच्या भरती जाहीर केली आहे. 

सध्या पुण्यात शहरी भागाच्या बरोबरीनेच ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. शहरी भागात खाजगी हाॅस्पिटलच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु ग्रामीण भागात 80 टक्क्यांपेक्षा अधिक लोक हे सरकारी आरोग्य सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर उपलब्ध नसल्याने सुविधा निर्माण करून देखील रूग्णांना उपचार देता येत नाहीत. यासाठीच जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये आता पर्यंत शासनाने पुणे जिल्हा परिषदेसाठी डाॅक्टर,  नर्स,  आरोग्य सेविका, वाॅर्ड बाॅयसह औषध निर्माता, भूलतज्ज्ञ अशी विविध पदे भरली आहेत. एमडी डाॅक्टर आणि एमबीबीएस डॉक्टर देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आता महाराष्ट्रासह देशातील अन्य 12 राज्यात देखील जिल्हा परिषदेच्या वतीने जाहिरात करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात एमडी आणि एमबीबीएस डॉक्टरांची भरती केवळ कोविड साथीसाठी करण्यात येणार असून,  यात एमडी डाॅक्टरांना दर महा दीड लाख तर एमबीबीएस डॉक्टरांना दर महा 90 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.
-------
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची कोविडसाठी मदत 
पुणे जिल्हा ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी मदत करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा  पगार म्हणजे १ कोटी ९७ लाख रुपये पुणे जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी व कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत म्हणून दिले आहेत.

Web Title: Pune Zilla Parishad's 'Bumper' offer for young people who want to work in the medical field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.