पुणे विद्यापीठ करणार पश्चिम भागातील वनस्पतींचा अभ्यास ;दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनास मदत  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 08:05 PM2020-02-24T20:05:18+5:302020-02-24T20:17:29+5:30

देशाच्या पश्चिम विभागात गुग्गुळ, सोनामुखी, इसबगोल, अश्वगंधा, सिताअशोक, बेल, शिवन, पाडळ, टेटू, अग्निमंथ, रानवांगी, सालवन, पीठवन, गोखरु, अनंतमूळ, खाजखुजली, बिवळा, बकुळ, पिंपळी, सफेदमुसळी, कोलीयस, लोध्र, वरुण, चित्रक अशा अनेक महत्त्वपूर्ण व प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळतात.

Pune University will study the plants in the West | पुणे विद्यापीठ करणार पश्चिम भागातील वनस्पतींचा अभ्यास ;दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनास मदत  

पुणे विद्यापीठ करणार पश्चिम भागातील वनस्पतींचा अभ्यास ;दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनास मदत  

Next
ठळक मुद्देपुणे विद्यापीठ करणार पश्चिम भागातील वनस्पतींचा अभ्यास दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींचे होणार संवर्धन 

पुणे : केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाला ‘पश्चिम विभागीय औषधी वनस्पती तथा माहिती केंद्र’ मंजूर झाले आहेत. तसेच त्यासाठी 1 कोटी 67 लाख रूपयांचा निधी दिला जाणार असून या केंद्राच्या माध्यमातून औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन व त्या अनुषंघाने आवश्यक असलेले संशोधन करण्यात येणार आहे.


विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाला मंजूर झालेल्या ‘पश्चिम विभागीय औषधी वनस्पती केंद्राच्या अंतर्गत गोवा, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, दादरा-नगर हवेली आणि दीव-दमण या राज्यांचा व केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट हे या केंद्राचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत, तर विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. अविनाश अडे हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
 देशात या पद्धतीची केवळ सात केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह कोलकता येथील जाधवपूर विद्यापीठ , जोगिंदर नगर येथील आरआयआयएसएम , जबलपूर येथील शेर-ए-काश्मीर विद्यापीठ, वन संषोधन केंद्र , केरळा फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट, आसाम अ‍ॅग्रिकल्चर विद्यापीठ यांचा समावेश आहे.


 डॉ. मोकाट म्हणाले, देशात व विदेशांत औषधी वनस्पतींची मोठी मागणी आहे. परंतु, अनेक कारणांमुळे ही औषधी वनस्पती संपदा नष्ट होऊ लागली आहे. परिणामी, औषधी कंपन्यांना व वैद्यांना कच्चा मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. देशाच्या पश्चिम विभागात गुग्गुळ, सोनामुखी, इसबगोल, अश्वगंधा, सिताअशोक, बेल, शिवन, पाडळ, टेटू, अग्निमंथ, रानवांगी, सालवन, पीठवन, गोखरु, अनंतमूळ, खाजखुजली, बिवळा, बकुळ, पिंपळी, सफेदमुसळी, कोलीयस, लोध्र, वरुण, चित्रक अशा अनेक महत्त्वपूर्ण व प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. त्यांचे संवर्धन करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. पश्चिम विभागीय केंद्रामार्फत जाणार पाचही राज्यांमध्ये बाजारपेठेत असलेली मागणी व दुर्मिळ होत असलेल्या औषधी वनस्पतींच्या रोपांची निर्मिती, त्यांची शास्त्रशुद्ध लागवड केली जाईल.   

Web Title: Pune University will study the plants in the West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.