पुणे एसटी महामंडळाचा दररोज बुडतोय ९५ लाखांचा महसुल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 01:28 PM2020-09-25T13:28:49+5:302020-09-25T13:29:49+5:30

दररोज सहन करावा लागत आहे १५ ते २० लाख रुपयांचा तोटा..

Pune ST department is losing Rs 95 lakh in revenue every day | पुणे एसटी महामंडळाचा दररोज बुडतोय ९५ लाखांचा महसुल

पुणे एसटी महामंडळाचा दररोज बुडतोय ९५ लाखांचा महसुल

Next
ठळक मुद्देअधिक प्रवासी असलेल्या मार्गांवर लक्ष केंद्रीत करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न

पुणे : एसटी महामंडळाने प्रवाशांना पुर्ण क्षमतेने प्रवास करण्यास हिरवा कंदील दाखविला असला तरी अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अनेक एसटी बस रिकाम्याच धावत असल्याने दररोज सुमारे ९५ लाख रुपयांचा महसुल बुडत आहे. तसेच सध्या धावणाऱ्या बसचा खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्याने दररोज १५ ते २० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
एसटी महामंडळाची आंतरजिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून सुरू झाली. त्यापैकी जिल्हांतर्गत बस धावत होत्या. आंतरजिल्हा बस सुरू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये वाढ होत गेली. एका बसमध्ये ५० टक्के प्रवासी घेणे बंधनकारक असल्याने एसटीला मोठा तोटा होत होता. हा तोटा कमी करण्यासाठी मागील आठवड्यात पुर्ण क्षमतेने प्रवासी नेण्याचा निर्णय झाला. पण त्यानंतरही फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. एसटीच्या पुणे विभागात म्हणजे पुणे जिल्ह्यातील विविध विभागांतून दररोज सुमारे २७५ बस मार्गावर येत आहेत. त्याद्वारे सुमारे ९० हजार किलोमीटरचा प्रवास होत असून सुमारे १८ हजार प्रवासी मिळत आहेत. या प्रवासातून सुमारे १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. लॉकडाऊनपुर्वी फेब्रुवारी महिन्यात दररोज सुमारे ८०० बस मार्गावर होत्या. तर सुमारे १ कोटी रुपये उत्पन्न होते. म्हणजे प्रति किलोमीटर ३५ रुपये उत्पन्न मिळत होते. दररोज सुमारे एक लाख प्रवासी बसचा वापर केला.

लॉकडाऊनपुर्वी व आताची स्थिती पाहता एसटीच्या पुणे विभागाचा सध्या दररोज सुमारे ९५ लाख रुपयांचा महसुल बुडत आहे. तसेच प्रति किलोमीटर सुमारे ४० ते ४३ रुपये खर्च व मिळणारे उत्पन्नाची तुलना केल्यास दररोज सुमारे १८ ते २० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. इंधनखर्च भागविणे कठीण जात असल्याने एसटीकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांवर नियंत्रण आणले जात आहेत. अधिक प्रवासी असलेल्या मार्गांवर लक्ष केंद्रीत करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे अधिकाºयांनी सांगितले.
----------------
पुणे विभागाची दैनंदिन स्थिती -
लॉकडाऊनपुर्वी                  सध्या
मार्गावर बस ८००               २७५
धाव (किमी) ३,१८,१३७      ९०, १३८
उत्पन्न १,१०,८२,०००        १५,१७,०००
प्रवासी (सुमारे) १,००,०००  १८,०००
--------------------------------------------------

Web Title: Pune ST department is losing Rs 95 lakh in revenue every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.