पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला; खडकवासला साखळी प्रकल्पात ९६ टक्के पाणीसाठा जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 12:07 PM2021-08-06T12:07:10+5:302021-08-06T12:07:40+5:30

समाधानकारक पाऊस झाल्यामुळे गुरुवार अखेर पानशेतसह पाच धरणे पूर्ण भरली

Pune residents' water problem solved; 96% water storage in Khadakwasla chain project | पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला; खडकवासला साखळी प्रकल्पात ९६ टक्के पाणीसाठा जमा

पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला; खडकवासला साखळी प्रकल्पात ९६ टक्के पाणीसाठा जमा

googlenewsNext
ठळक मुद्देखडकवासला प्रकल्प सोडून इतर सहा धरणांमध्ये ९२ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, कळमोडी, चासकमान आणि आंद्रा ही पाच धरणे पूर्ण भरली आहेत. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये २७.५९ टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. खडकवासला साखळी प्रकल्पात ९६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत यंदा दुपटीहून अधिक पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे गुरुवार अखेर पानशेतसह पाच धरणे पूर्ण भरली आहेत. खडकवासला धरणातून उजवा मुठा कालव्याद्वारे एक हजार १५५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर, इतर सहा धरणांमध्ये ९२ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला असून, तीही भरण्याच्या मार्गावर आहेत.

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभरात तुरळक पाऊस झाला. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५ मिलिमीटर, वरसगाव ४ मिमी, पानशेत ३ मिमी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

पुण्यातील चासकमान धरण १०० टक्के भरले

पुणे जिल्ह्यातील खेड व शिरूर तालुक्यातील शेतीचे नंदनवन करणारे चासकमान धरण हे १०० टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळेच चासकमान धरण पूर्ण भरून वाहायला लागले आहे. चासकमान धरणात पाणी साठवण्याची क्षमता ८.५० टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ दिवस आधीच हे धरण भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन धरणाच्या पाचही दरवाजाद्वारे भीमानदी पात्रात ९२५ क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. 

धरणांतील सोमवारी सायंकाळपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि कंसात टक्केवारी

- टेमघर ३.०६ (८२.५२)
- वरसगाव ११.९९ (९३.४९)
- पानशेत १०.६२(९९.७१)
- खडकवासला १.९३ (९७.६०)
- पवना ७.८५ (९२.२८)
- कळमोडी १.५१ (१००)
- चासकमान ७.५७ (१००)
- आंद्रा २.९२ (१००)
- गुंजवणी ३.४० (९२.२९)
- नीरा देवघर ११.६५ (९९.३६)
- भाटघर १९.७६ (८४.०८)
- वीर ९.२४ (९८.२१)
- भामा आसखेड ६.५७ (८५.६९)
- मुळशी १७.०९ (८४.७८)

Web Title: Pune residents' water problem solved; 96% water storage in Khadakwasla chain project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.