प्रवाशांनो, इकडे लक्ष द्या..! सांगानेर अन् नागपूर दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या १२ फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:02 IST2025-12-09T11:01:41+5:302025-12-09T11:02:29+5:30
पुणे-सांगानेर विशेष गाडी गाडी क्र. ०१४०५ दि. १९, २६ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सांगानेर (एसएनजीएन) येथे पोहोचेल.

प्रवाशांनो, इकडे लक्ष द्या..! सांगानेर अन् नागपूर दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या १२ फेऱ्या
पुणे : नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणेरेल्वे विभागातून पुणे-सांगानेर आणि पुणे-नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाडी क्र. ०१४०५/०१४०६ पुणे-सांगानेर साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या, तर गाडी क्र. ०१४०१ /०१४०२ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या ६ फेऱ्या अशा एकूण १२ फेऱ्या होणार आहेत.
पुणे-सांगानेर विशेष गाडी गाडी क्र. ०१४०५ दि. १९, २६ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सांगानेर (एसएनजीएन) येथे पोहोचेल. तर गाडी क्र. ०१४०६ सांगानेर-पुणे स्पेशल दि. २०, २७ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी सांगानेर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, कमान रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, अंकलेश्वर, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा आणि सवाई माधोपूर येथे थांबा असेल.
गाडी क्र. ०१४०१ पुणे-नागपूर विशेष गाडी दि. १९, २६ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी पुण्याहून रात्री साडेआठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. गाडी क्र. ०१४०२ नागपूर-पुणे विशेष गाडी दि. २०, २७ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी नागपूरहून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे.