पुण्यात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले; एका गड्डीची किंमत ६० रुपयांपासून सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:07 AM2021-10-25T11:07:02+5:302021-10-25T11:07:08+5:30

पुण्यातील मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक तुलनेने कमी झाल्याने कोथिंबीर, शेपू, करडई, राजगिऱ्याच्या भावात वाढ झाली आहे

In Pune, the prices of leafy vegetables increses start at Rs 60 | पुण्यात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले; एका गड्डीची किंमत ६० रुपयांपासून सुरु

पुण्यात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले; एका गड्डीची किंमत ६० रुपयांपासून सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देमेथी, चाकवत, पुदिना, चुका आणि पालकच्या भावात मात्र घट

पुणे: पुणे शहर आणि उपनगरात कोथिंबिरीची जुडी ६० ते ८० रुपयांना विक्री केली जात होती, तसेच मेथीची जुडीही ५० ते ७० रुपयांना विक्री होत होती, तर मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक तुलनेने कमी झाल्याने कोथिंबीर, शेपू, करडई, राजगिऱ्याच्या भावात वाढ झाली आहे. मात्र, मेथी, चाकवत, पुदिना, चुका आणि पालकच्या भावात मात्र घट झाली आहे, तर कांदापात, अंबाडी, मुळे आाणि चवळीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

कोथिंबिरीची सव्वालाख जुड्यांची तर मेथीची अवघी २५ हजार जुड्यांची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीची जुडी १५ ते ३५ रुपये, तर किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपयांना विक्री केली जात होती. मेथीची घाऊक बाजारात १० ते २५ रुपये, तर किरकोळ बाजारात ५० ते ७० रुपयांना विक्री केली जात होती.

पालेभाज्यांचे घाऊक बाजारातील भाव (शेकडा जुडी) 

कोथिंबीर : १०००-२५००, मेथी : १५००-२५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ८००-१०००, करडई : १०००-१२००, पुदिना : ३००-४००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : १०००-१२००, चुका : ९००-१०००, पालक : १२००-१६००, चवळी : १०००-१२००.

Web Title: In Pune, the prices of leafy vegetables increses start at Rs 60

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.