Pune Mini Lockdown : पुण्यात भाजप आक्रमक; खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 01:53 PM2021-04-03T13:53:24+5:302021-04-03T14:17:48+5:30

Bjp Agitation In Pune : प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदी आणि पीएमपी सेवा बंद च्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध....

Pune Mini Lockdown : Bjp aggressive in Pune; Police detain BJP activists including MP Girish Bapat | Pune Mini Lockdown : पुण्यात भाजप आक्रमक; खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Pune Mini Lockdown : पुण्यात भाजप आक्रमक; खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Next

पुणे: उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीनंतर पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचे आदेश काढले आहे. त्यात पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीची कणा असलेली 'पीएमपीएल' सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याच्याच निषेधार्ह भाजपकडून जमावबंदीच्या पहिल्याच दिवशी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी पोलिसांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

पुण्यात संचारबंदी व पीएमपीएमएल सेवा बंद या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठीच खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथील पीएमपीएलच्या  ॲाफिस बाहेर आंदोलन केले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.तसेच संचारबंदीचा आदेश आपण पाळणार नसल्याचे मुळीक यांनी यावेळी जाहीर केले आहे. मात्र, इतर कार्यकर्त्यांनी देखील इथे हजेरी लावली आहे. 

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी बापट आणि मुळीक यांची भेट घेत त्यांना जमावबंदीमुळे आंदोलन संपवण्याची विनंती केली.मात्र यावेळी भाजप नेत्यांनी त्यांची विनंती धुडकावून लावत माघार घेण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
 
खासदार गिरीश बापट म्हणाले “ लोकांना जायला न मिळण्याचे थेट परिणाम आर्थिक घडी विस्कटण्यावर होणार आहेत. जमावबंदी आम्हांला मान्य. पण संचारबंदी नाही. टेस्टींग वाढवा, ग्रुप करणाऱ्यांना दंड करा. पण फक्त सत्ता आहे म्हणून दहशत करणे योग्य नाही. सरकार जे करेल त्याला आम्ही मदत करु. कोरोना फक्त सरकारची जबाबदारी नाहीत. पण संचारबंदी आणि पीएमपीएमएल बंद करण्यासाठी आमचा विरोध आहे. तसेच निर्णयाचा फेरविचार केला नाही तर भाजप कार्यकर्ते पीएमपीएल च्या प्रत्येक स्टॉपवर आंदोलन करतील असेही ते यावेळी म्हणाले. 

मुळीक म्हणाले “ सरकारने हा निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. पीएमपीएमएल वर अनेक सर्वसामान्य लोक अवलंबून आहेत. या बसेस बंद करण्याचा निर्णय योग्य नव्हता. तरी देखील हा निर्णय घेतला आहे. कारण नसताना संचारबंदी लावली आहे. या अर्धवट लॅाकडाउन चा परिणाम खुप मोठा होणार आहे. सरकारने ज्यांचे नुकसान होणार आहे त्यांना पॅकेज दिलं पाहीजे. त्यामुळे आम्ही संचारबंदीचा आदेश मोडणार आहोत.”

Web Title: Pune Mini Lockdown : Bjp aggressive in Pune; Police detain BJP activists including MP Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.