पुणे ‘पदवीधर’ आणि‘शिक्षक’निवडणुकीसाठी विक्रमी मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 04:11 AM2020-12-02T04:11:26+5:302020-12-02T11:23:49+5:30

-सर्वाधिक मतदान पुण्यातून -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख नियोजन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक या ...

Pune ‘Graduate’ - Record turnout for ‘Teacher’ | पुणे ‘पदवीधर’ आणि‘शिक्षक’निवडणुकीसाठी विक्रमी मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

पुणे ‘पदवीधर’ आणि‘शिक्षक’निवडणुकीसाठी विक्रमी मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Next

-सर्वाधिक मतदान पुण्यातून

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. १) आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. पदवीधर मतदार संघात दुपारी ४ वाजेपर्यंत ९.५२ टक्के तर शिक्षक मतदार संघात ६७.३६ टक्के मतदान झाले.

शंभर टक्के नवी मतदार यादी, उमेदवारांची सर्वाधिक संख्या, भाजप-महाआघाडीतील चुरस आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेले चोख नियोजन यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. पहिल्यांदाच मतदान करण्याचा हक्क हजारो जणांनी उत्साहाने बजावला. तुरळक अपवाद वगळता संपूर्ण विभागात शांततेत मतदान पार पडले.

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी निवडणुकीनंतर आघाडी करत वर्षापुर्वी राज्यात सरकार स्थापन केले. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधात बसावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीच्या निमित्ताने महाआघाडी आणि भाजपा आमनेसामने आले. यामुळे चुरस वाढली होती.

परिणामी एरवी पदवीधर आणि शिक्षक मतदारांमध्ये जाणवणारा निरुत्साह यंदा गायब झाला होता. मतदार नोंदणीपासूनच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी झपाट्याने काम केले. त्यामुळे ३० टक्क्यांच्या आतबाहेर रेंगाळणारी मतदानाची टक्केवारी यंदा पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचली. दरम्यान दुपारी चारनंतर झालेले मतदान रात्री उशीरापर्यंत अद्ययावत करण्यात आलेली नव्हती.

दुपारी चारपर्यंत सर्वात कमी मतदान पुणे जिल्ह्यात तर सर्वाधिक मतदान कोल्हापुर जिल्ह्यात झाले. पुण्याची टक्केवारी कमी असली तरी एकूण मतदान केलेल्या मतदारांची संख्या विभागात सर्वाधिक आहे.

चौकट

दुपारी चारपर्यंतचे मतदान

पदवीधर मतदारसंघ

जिल्हा एकूण मतदार मतदान टक्केवारी

पुणे १ लाख ३६ हजार ६११ ५३ हजार ९७१ ३९.५१

सातारा ५९ हजार ७१ २९ हजार १५४ ४९.३५

सांगली ८७ हजार २३३ ४५ हजार ९६२ ५२.६९

सोलापूर ५३ हजार ८१३ २८ हजार ३६ ५२.१०

कोल्हापूर ८९ हजार ५२९ ५३ हजार ९७४ ६०.२९.

एकूण ४ लाख २६ हजार २५७ २ लाख ११ हजार ९७ ४९.५२

----------

शिक्षक मतदारसंघ

जिल्हा एकूण मतदार झालेले मतदान टक्केवारी

पुणे ३२ हजार २०१ १७ हजार ३८१ ५३.९८

सातारा ७ हजार ७११ ५ हजार ७३४ ७४.३६

सांगली ६ हजार ८१३ ५ हजार २२४ ७६.६९

सोलापूर १३ हजार ५८४ १० हजार ४७६ ७७.१२.

कोल्हापूर १२ हजार २३७ १० हजार ५४ ८२.१६

एकूण ७२ हजार ५४५ ४८ हजार ८६९ ६७.३६

चौकट

प्रथमच पदवीधरांमध्ये उत्साह

न्यायालयाच्या आदेशानुसार यावेळी प्रथमच जुनी सर्व मतदार यादी रद्द करून शंभर टक्के नव्याने मतदार यादी तयार करण्यात आली. यामुळे पदवीधर होऊन अनेक वर्षे होऊनही आतापर्यंत कधीही मतदान न केलेल्या अनेक पदवीधरांनी या निवडणुकीत प्रथमच मतदान केले.

Web Title: Pune ‘Graduate’ - Record turnout for ‘Teacher’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.