Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:44 IST2025-12-09T15:41:07+5:302025-12-09T15:44:21+5:30
Pune crime News: पुण्यात एका तरुणाने शाळेकरी मुलीसोबत ओळख निर्माण केली. विश्वास संपादन केला आणि नंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला.

Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
शाळेत निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी ओळख झालेल्या तरुणाने शाळेत सोडतो म्हणून नेले आणि अत्याचार केल्याच्या संतापजनक घटना घडली आहे. आरोपी तरुण महाविद्यालयात शिकतो. काही दिवसांपूर्वी त्यांची तरुणीशी बस स्थानकावर ओळख झाली होती. त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला आणि नंतर हा संतापजनक प्रकार केला.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरामध्ये अत्याचाराची ही घटना घडली आहे. चार डिसेंबर रोजी घडलेली ही घटना पीडित मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर समोर आली.
मुनाकीब अन्सारी असे अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे. तो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याची आणि पीडित मुलीची काही दिवसांपूर्वी एका बस स्थानकावर ओळख झाली होती. त्यानंतर त्याने हळूहळू तरुणीसोबत ओळख वाढवली.
चार डिसेंबर रोजी आरोपी तरुण मुलीला भेटला. तो तरुणीला म्हणाला चल तुला शाळेत सोडतो. असे म्हणून त्याने तिला विश्वासात घेतले आणि तिला स्वतःच्या गाडीवर बसवले. त्यानंतर तो तरुणीला शाळेत घेऊन गेलाच नाही.
मुनाकीब अन्सारी याने तरुणीला नंतर शाळेत नेण्याऐवजी एका खोलीवर नेले. तिथे गेल्यावर त्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. या प्रकरणी आईवडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.