पुणेकरांनी ५८ दिवसात भरला ५८५ कोटींपेक्षा अधिक मिळकत कर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:07 PM2021-05-28T22:07:18+5:302021-05-28T22:07:51+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पुणेकरांची प्रशासनाला साथ : विलास कानडे

Pune citizens paid tax more than Rs 585 crore in 58 days | पुणेकरांनी ५८ दिवसात भरला ५८५ कोटींपेक्षा अधिक मिळकत कर

पुणेकरांनी ५८ दिवसात भरला ५८५ कोटींपेक्षा अधिक मिळकत कर

Next

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाला साथ देत पुणेकरांनी देशात सर्वाधिक मिळकत कर जमा केला. त्यामुळे कोरोनाच्या काळातही पालिकेचा आर्थिक गाडा रुळावर राहिला. पुणेकरांची हीच साथ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कायम असून १ एप्रिल ते २८ मे या ५८ दिवसांमध्ये  ४ लाख ४३ हजार ३९९ पुणेकरांनी ५८५ कोटी १४ लाख रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कर जमा होण्यात दुपटीने वाढ झाल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.   

मागील वर्षी कोरोना काळात ०१ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळात संपूर्ण मिळकतकर भरलेल्या निवासी मिळकतधारकांना३१ मे २०२१ पूर्वी संपूर्ण मिळकतकर जमा केल्यास सर्व करांवर (शासनाचे कर वगळून) १५ टक्के  सवलत दिली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात २८ मेपर्यंत तब्बल ३ लाख ३६ हजार २९४ मिळकत धारकांना १५ टक्के सवलत मिळाली आहे. या मिळकतधारकांनी २५३ कोटी ३४ लाख रुपयांचा कर जमा केला असून त्यांना ४२ कोटी ०५ लाख रुपये सवलत मिळाली आहे.

याव्यतिरिक्त ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना सर्वसाधारण करामध्ये १० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच, ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारांपेक्षा पेक्षा जास्त आहे, त्यांना ५ टक्के सवलत देण्यात येत आहे. सवलत मिळण्याकरिता ३१ मेपूर्वी मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक असल्याचे कानडे यांनी सांगितले. यंदाही नागरिकांनी डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन भरणा केला आहे. 
------ 
भरणा पद्धत। मिळकती। टक्केवारी। रक्कम (कोटीत) डिजिटल। ३,४२,६६८। ७७.२८%। ३९४.७७ 
रोख। ५४,२४६। १२.२३। ४१.०१ 
धनादेश। ४६,४८५। १०.४८। १४९.३५

Web Title: Pune citizens paid tax more than Rs 585 crore in 58 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.