रेल्वेला फुकट्या प्रवाशांचा जाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 12:13 PM2019-09-21T12:13:29+5:302019-09-21T12:34:47+5:30

तिकीटदर कमी असूनही लाखो प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असून दरवर्षी त्यामध्ये वाढच होत चालली आहे..

problem create of railway by without ticket passengers | रेल्वेला फुकट्या प्रवाशांचा जाच

रेल्वेला फुकट्या प्रवाशांचा जाच

googlenewsNext
ठळक मुद्देदरवर्षी वाढतेय प्रमाण : रेल्वेकडून विशेष पथकांमार्फत तपासणी यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांतच सुमारे ७१ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडले

पुणे : अत्यंत कमी दरात प्रवाशांना सेवा देणाऱ्या रेल्वेला फुकट्या प्रवाशांचा जाच होत आहे. तिकीटदर कमी असूनही लाखो प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असून दरवर्षी त्यामध्ये वाढच होत चालली आहे. यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांतच सुमारे ७१ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडले आहे. मागील वर्षभरात हा आकडा दीड लाखांहून अधिक होता. 
मध्य रेल्वेच्यापुणे विभागाकडून पुणे ते मळवली, पुणे ते बारामती, पुणे ते मिरज व मिरज ते कोल्हापूर या मार्गांवरील गाड्या, तसेच स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते. त्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत आहेत. विनातिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी ही पथके अचानक कोणत्याही रेल्वेगाडीमध्ये जाऊन तिकीट तपासणी करतात. तसेच एखादी गाडी स्थानकात आल्यानंतर गाडीतून उतरणाºया प्रवाशांचीही तपासणी केली जाते. यामध्ये विनातिकीट किंवा चुकीचे तिकीट आढळल्यास संबंधित प्रवाशाकडून कमीत कमी २५० रुपये दंड वसूल केला जातो. तसेच रेल्वेकडून तिकीट तपासणीसही स्वतंत्रपणे ही तपासणी करतात. तरीही फुकट्या प्रवाशांवर वचक ठेवण्यात रेल्वेला अपयश येताना दिसत आहे. रेल्वेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१५-१६ या वर्षात सुमारे १ लाख ५ हजार विनातिकीट प्रवासी पकडले होते. त्यांच्याकडून पावणेसहा कोटी रुपयांची दंडवसुली केली. त्यापुढील वर्षी या प्रवाशांच्या आकडा २५ हजाराने वाढला. त्यानंतर २०१७-१८ मध्ये ८ हजारांनी तर २०१८-१९ मध्ये त्यात १४ हजार प्रवाशांची भर पडली. मागील वर्षी दीड लाखांहून अधिक प्रवासी फुकट प्रवास करीत होते. त्यांच्याकडून तब्बल ८ कोटी २० लाख रुपयांच्या दंडाची वसुली केली. यावर्षी केवळ पाच महिन्यांतच सुमारे ७१ हजार प्रवासी पकडले असून ४ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. आधीच तिकीटदर कमी असल्याने खर्चाच्या तुलनेत तोटा सहन करून प्रवासीसेवा देणाºया रेल्वेला फुकट्या प्रवाशांमुळे आणखी तोटा सहन करावा लागत आहे. त्यांच्याकडून कोट्यवधींचा दंड वसूल केला जात असला तरी प्रत्यक्षात विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या अधिक असू शकते. प्रत्येक गाडी, प्रवाशांची तिकीट तपासणी करणे शक्य नसल्याने अनेक फुकटे प्रवासी सहीसलामत सुटतात. त्यामुळे रेल्वेचा महसूल बुडत आहे. 
.....
मागील ५ वर्षांची फुकट्या प्रवाशांची संख्या
वर्ष    फुकटे प्रवासी    दंडवसुली
२०१५-१६    १,०५,२०५    ५,७८,४२,२२९    
२०१६-१७    १,३०,३७९    ६,६९,८२,३०३
२०१७-१८    १,३८,२७५    ७,६६,९२,९७७
२०१८-१९    १,५२,२५२    ८,२०,५८,०५८
२०१९-२०    ७०,९८३    ४,००,००,०००
(ऑगस्टअखेर)
............

रेल्वेकडून प्रवाशांना अनारक्षित तिकिटासाठी यूटीएस अ‍ॅप ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईलवरून तिकीट घेता येते. त्यामुळे तिकीट खिडकीवरील गर्दीही कमी झाले आहे. आरक्षित तिकिटेही ऑनलाईन घेता येतात. पण तरीही प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केला जात आहे. रेल्वेकडून सातत्याने तपासणी मोहीम राबविली जाते. कारवाई होऊनही अनेक प्रवासी तिकीट न घेताच प्रवास करतात. त्याचा रेल्वेला फटका बसत आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

Web Title: problem create of railway by without ticket passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.