डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा खालावली; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 02:06 PM2022-06-28T14:06:53+5:302022-06-28T14:07:43+5:30

मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती - अनिकेत आमटे

Prakash Amte health deteriorated again Dinanath Mangeshkar admitted to hospital | डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा खालावली; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा खालावली; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

googlenewsNext

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना न्यूमोनियाची लागण झाल्याने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चिंतेची बाब म्हणजे डॉ. आमटे यांना यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचेही निदान झाले होते. न्युमोनियावरील उपचार झाल्यानंतर ब्लड कॅन्सरवर उपचार केले जाणार आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यानंतर हे उपचार केले जाणार असल्याचे त्यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी सांगितले  होते. त्यानंतर १७ जूनला तब्येत बरी असल्याने बाबांना डिस्चार्ज दिल्याची माहिती अनिकेत आमटे यांनी दिली होती. परंतु काल पुन्हा तब्येत खालावल्याने त्यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या माधमातून दिली आहे.  

''प्रकाश आमटे यांना २७ जूनला पुन्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता डॉक्टरांनी सर्व व्हिसिटर्सला पूर्ण प्रवेश बंद केला आहे. त्यांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे. आणि high fever आहे. आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही असेल अपडेट ते सोशल मीडिया वर टाकत जाईन. असे त्यांनी सांगितले आहे.''  

''कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये. योग्य उपचार सुरू आहेत. माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे. त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह मुळीच करू नये. बरे झाल्यावर नक्की भेटायला यावे हेमलकसाला असे अनिकेत आमटे यांनी पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.'' 

Web Title: Prakash Amte health deteriorated again Dinanath Mangeshkar admitted to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.