प्रगती, कोयना एक्स्प्रेस पुन्हा 10 दिवसांसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 10:40 AM2019-10-06T10:40:22+5:302019-10-06T10:40:59+5:30

कोयना एक्स्प्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार असून पुणे-मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

Pragati, Koyna Express again shut down for 10 days; mumbai pune rail track closed | प्रगती, कोयना एक्स्प्रेस पुन्हा 10 दिवसांसाठी बंद

प्रगती, कोयना एक्स्प्रेस पुन्हा 10 दिवसांसाठी बंद

googlenewsNext

पुणे : मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रामध्ये तांत्रिक तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी पुढील दहा दिवस रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


कोयना एक्स्प्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार असून पुणे-मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी 5 ते 14 ऑक्टोबर काळाता दौंड-मनमाडमार्गे धावणार आहे. हुबळी-मुंबई, हैदराबाद, विशाखापट्टनम, नांदेड या गाड्याही मुंबईला न येता पुण्यापर्यंतच धावणार आहेत. तर हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस, मुंबई पंढरपूर पॅसेंजर, मुंबई विजापूर पॅसेंजर या रद्द करण्यात आल्या आहेत. 


पावसाळ्यामध्ये मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने 26 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा 10 दिवस रेल्वे बंद राहणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. यामुळे एक्स्प्रेस हायवे आणि जुन्या महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. 

Web Title: Pragati, Koyna Express again shut down for 10 days; mumbai pune rail track closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.