सकारात्मक बातमी! कोरोना लॉकडाऊन काळात पुण्यातील प्रदूषणामध्ये झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 12:10 AM2020-08-01T00:10:16+5:302020-08-01T00:10:32+5:30

३६५ दिवसांपैकी हवेतील अतिसुक्ष्म धुलिकणांचे प्रमाण समाधानकारक

Positive News! Pollution decreased in pune city during corona lockdown | सकारात्मक बातमी! कोरोना लॉकडाऊन काळात पुण्यातील प्रदूषणामध्ये झाली घट

सकारात्मक बातमी! कोरोना लॉकडाऊन काळात पुण्यातील प्रदूषणामध्ये झाली घट

Next
ठळक मुद्देशहरात प्रति व्यक्तिमागे आहे एकपेक्षा अधिक झाडे

पुणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणामध्ये घट झाली असून पर्यावरणावर त्याचा सकारात्मक बदल झाला. शहरातील हवा, पाणी व ध्वनी या घटकांच्या प्रदूषणाची लॉकडाऊन काळातील पातळी मोजण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान या सर्व घटकांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकापेक्षा कमी झाल्याचे पालिकेच्या पर्यावरण विषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ३६५ दिवसांपैकी हवेतील अतिसुक्ष्म धुलिकणांचे (पी. एम. २.५) प्रमाण हे १५६ दिवस समाधानकारक, १४९ दिवस चांगले, ५९ दिवस मध्यम स्वरूपाचे होते. तर केवळ १ दिवस हे प्रमाण खराब होते. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासोबतच हरितक्षेत्र वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन, बायोमिथेनायझेशन, वेस्ट टू एनर्जी, इंसिनरेशन इ. सारखे प्रकल्प, ईबेस्ट, बायो-मेडिकल वेस्ट, गार्डन वेस्टचे संकलन, अपारंपरिक उर्जेचा वापर-सौरऊर्जा, गांडूळखत आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्या मिळकतींना सवलत, यासोबतच स्मशानभूमीतील विद्युत दाहिन्या, सौर उर्जेचा वाढता वापर आदी बाबींचा समावेश या अहवालात करण्यात आला आहे. 
----///---- 
शहरात २०१९ मध्ये सर्वात जास्त तापमान २९ एप्रिल रोजी ४३ डिग्री सेंटीग्रेड, तर सर्वात कमी तापमान ९ फेब्रुवारी २०१९ रोजी ५.१ डिग्री सेंटीग्रेड इतके नोंदविले गेले. तसेच मागील तीन दशकात सन २०१९ मध्ये सर्वात जास्त १४११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
--------
शहरात प्रति व्यक्तिमागे आहे एकपेक्षा अधिक झाडे
शहरात तब्बल ४१ लाख ९४ हजार ६२३ झाडे असल्याचे पालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे. झाडांच्या ४१८ प्रजाती नमूद करण्यात आल्या असून गिरिपुष्प या झाडाची संख्या सर्वांधिक आहे. दुर्मिळ वृक्षांची संख्या १११ आहे. तर सर्वात मोठे झाड वडाचे असुन ते १२०२ सेंटीमीटर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शहराच्या ३५ लाख लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची गणना अधिक भरली आहे.

पालिकेने शहरातील वृक्षांची गणना करण्यासाठी जीपीएस-ग्लोबल पोेझिशनिंग सिस्टिम आणि जीआयएस -जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम यांसारख्या प्रणालीचा वापर केला आहे. झाडांच्या स्थानांची अचूक माहिती तसेच एकूण संख्या आदी घटकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये शहरातील ग्रीन कव्हर चांगले असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Positive News! Pollution decreased in pune city during corona lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.