काय सांगता! 'एमपीएससी' आंदोलनातील पोलीस निघाले कोरोनाबाधित; विद्यार्थ्यांसह पोलीस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 01:40 PM2021-03-16T13:40:22+5:302021-03-16T13:41:24+5:30

पोलीस दलासह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Police were Corona positive in the MPSC agitation ; fear condition in student and police force | काय सांगता! 'एमपीएससी' आंदोलनातील पोलीस निघाले कोरोनाबाधित; विद्यार्थ्यांसह पोलीस दलात खळबळ

काय सांगता! 'एमपीएससी' आंदोलनातील पोलीस निघाले कोरोनाबाधित; विद्यार्थ्यांसह पोलीस दलात खळबळ

Next

पुणे : 'एमपीएससी' ची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. मात्र, आता या आंदोलनासंबंधी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आंदोलनावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या विशेष शाखेतील दोन अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे पोलीस दलासह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील पोलिसांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. 

आतापर्यंत पुणे पोलीस दलातील १ हजार ५३० पोलिसांना कोरोना झाला असून यामधील ४२ पोलिसांवर अद्यापही उपचार सुरू आहे. शहरात सध्या कोरोनाग्रस्त ४२ पोलिस उपचार घेत असून त्यामध्ये ९ अधिकारी व ३३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ४२ पैकी १६ पोलिस हॉस्पिटलमध्ये तर २६ जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हा वाढत प्रादुर्भाव आटोक्यात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. पण नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधनात्मक नियमांचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनासमोर वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 

पोलीस दलातही कोरोना संसर्गाचा वेढा 
शहरात रात्री १० ते ६ पर्यंत संचारबंदी असल्याने पोलिसांचा अनेक ठिकाणी नाकाबंदीसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. मात्र याच संचारबंदीच्या काळात रस्त्यावर कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येत आहे.त्यामुळे पोलीस दलात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढतो आहे. 


 

Web Title: Police were Corona positive in the MPSC agitation ; fear condition in student and police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.