वडगाव मावळात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 02:25 PM2022-01-25T14:25:22+5:302022-01-25T14:25:36+5:30

चारचाकी वाहने २, दुचाकी वाहने ३, मोबाईल ३२ मोबाईल, रोख रक्कम २५,००० असा एकूण ११ लाख, ५९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

Police raid gambling den in wadgaon maval 11 lakh confiscated 33 arrested | वडगाव मावळात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३३ जणांना अटक

वडगाव मावळात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३३ जणांना अटक

Next

वडगाव मावळ : वडगाव मावळपोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करून रोख रक्कमेसह ११ लाख ५९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ३३ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दोन आरोपी फरार आहेत. ही कारवाई गिरी पोल्ट्री जवळ, मोरया कॉलनी, वडगाव मावळ येथे सोमवारी (दि.२४) रात्री ८ वा. केली.

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ हद्दीत गिरी पोल्ट्री जवळ, मोरया कॉलनी, संतोष रामदास ढोरे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वडगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ ३३ आरोपींना अटक केली. चारचाकी वाहने २, दुचाकी वाहने ३, मोबाईल ३२ मोबाईल, रोख रक्कम २५,००० असा एकूण ११ लाख, ५९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार प्रकरणी ३३ आरोपीना अटक केली असून सागर पांडुरंग वायकर व संतोष रामदास ढोरे हे आरोपी फरार आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे, लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले,  पोलीस उप निरीक्षक संतोष चामे, पोलीस कर्मचारी सुनील जावळे, अजित ननावरे, आशिष काळे, अमोल तावरे, मनोज कदम, अमोल ननावरे, श्रीशल्य कंटोळी, शैलेश खोपडे, संजय सुपे, गणपत होले, अजय शिंदे, अनिकेत बोऱ्हाडे, शिवाजी घुटे आदींनी मोठ्या शिताफीने ३३ आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे करत आहेत.

Web Title: Police raid gambling den in wadgaon maval 11 lakh confiscated 33 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.