पुणे व पिंपरी महापालिकांप्रमाणे 'पीएमआरडीए'नेही 'पीएमपीएल'ला संचलन तूट द्यावी: लक्ष्मीनारायण मिश्रा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:48 PM2021-07-14T21:48:45+5:302021-07-14T21:49:33+5:30

पीएमपीच्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली आणि डिजिटल माध्यमाद्वारे काम केले जाणार

PMRDA should also give impetus to PMPL Likely Pune and Pimpri Municipal Corporations: Laxminarayan Mishra | पुणे व पिंपरी महापालिकांप्रमाणे 'पीएमआरडीए'नेही 'पीएमपीएल'ला संचलन तूट द्यावी: लक्ष्मीनारायण मिश्रा 

पुणे व पिंपरी महापालिकांप्रमाणे 'पीएमआरडीए'नेही 'पीएमपीएल'ला संचलन तूट द्यावी: लक्ष्मीनारायण मिश्रा 

googlenewsNext
ठळक मुद्देबससेवेचा विस्तार ग्रामीण भागात झाल्याने मागणी

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका ज्याप्रमाणे 'पीएमपीएमएल'ला संचलन तूट देतात, त्याप्रमाणे पुणे महानगर क्षेत्र विकास विकास महामंडळानेदेखील संचलन तूट द्यावी. पीएमपीच्या बससेवेचा विस्तार पीएमआरडीएच्या हद्दीपर्यंत झाला आहे. त्याला संचालक मंडळाने मान्यताही दिलेली आहे. त्यानूसार महामंडळाने पीएमआरडीएच्या हद्दीत बस मार्ग देखील सुरू केले असून संचलन तूट देण्याविषयी पीएमआरडीएशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, पीएमआरडीएकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

'पीएमपीएल'च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी(दि.१४) पत्रकारांशी बुधवारी संवाद साधला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक (प्रभारी) दत्तात्रय झेंडे, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) सतीश घाटे उपस्थित होते. 

मिश्रा म्हणाले, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली आणि डिजिटल माध्यमाद्वारे काम केले जाणार आहे. प्रवाशांना मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे बस प्रवासामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती मिळणार आहे. या सुविधेद्वारे प्रवाशांना त्यांच्या मार्गावरील बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. उत्पन्न वाढीसाठी देखील डिजिटल जाहिरातीवर भर देण्यात येणार असल्याचे मिश्रा म्हणाले.  मिश्रा यांनी पीएमपीच्या सर्व विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. महामंडळाची बससंख्या, कोरोनामुळे बसलेला फटका, सद्यःस्थितीमध्ये सुरू असलेल्या बस याची माहिती घेतली.
------/------
मिश्रा म्हणाले...
१. बसचे लाईव्ह लोकेशन ते बसमध्ये प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढण्यापर्यंतची ऑनलाईन सुविधा देणार.
२. महामंडळाकडून देण्यात येणार्‍या इतर सोयी - सुविधा ऑनलाईन करणार.
३. खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांना  सार्वजनिक वाहतूकीकडे वळविण्यासाठी नियोजन.
४. संचलन तूट येण्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यावर काम करणार.

Web Title: PMRDA should also give impetus to PMPL Likely Pune and Pimpri Municipal Corporations: Laxminarayan Mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.