हवामान विभागाची 'सुखद'वार्ता! मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 09:44 PM2021-05-14T21:44:10+5:302021-05-14T21:45:02+5:30

या वर्षी देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज....

'Pleasant' news from the weather department! Monsoon will arrive in Kerala on May 31 | हवामान विभागाची 'सुखद'वार्ता! मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार

हवामान विभागाची 'सुखद'वार्ता! मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार

Next

पुणे : मे महिन्याच्या मध्याला नेहमीच सर्वांचे लक्ष मॉन्सून कधी येणार याकडे लागले असते.  हवामान विभागाने एक सुखद वार्ता आज दिली आहे. केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे जाहीर केले आहे. मॉन्सूनच्या आगमनात चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केले आहे.

सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे आगमन १ जून रोजी केरळवर होत आले आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये हवामान विभागाने १ जून रोजी मॉन्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्याचे ५ जून रोजी आगमन झाले होते. हवामान विभागाकडून दरवर्षी १५ मे रोजी मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाविषयीचा अंदाज जाहीर करण्यात येतो. यंदा तो १४ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. 

दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचे वारे हे २१ मेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंदमान समुद्रात २२ मे रोजी मॉन्सून स्थिरावेल. सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळ आले असल्याने मॉन्सूनच्या आगमनाला बळकटी येणार आहे. 

गेल्य पाच वर्षातील हवामान विभागाने मॉन्सूनचा केरळमधील आगमनाची तारीख व प्रत्यक्षात केरळमध्ये दाखल झालेल्याची तारीख

वर्ष प्रत्यक्षात दाखल हवामान विभागाचा अंदाज

२०१६ ८जून ७ जून

२०१७ ३० मे ३०मे

२०१८ २९ मे २९ मे

२०१९ ८ जून ६ जून

२०२० ५ जून १ जून

Web Title: 'Pleasant' news from the weather department! Monsoon will arrive in Kerala on May 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.