बारमधूनच दारू मागविण्याची परवानगी, वाईन शॉपचा उल्लेख आदेशात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:11 AM2021-04-15T04:11:45+5:302021-04-15T04:11:45+5:30

पुणे : महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवांसोबतच बार-रेस्टॉरंटमधून पार्सलद्वारे मद्य पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिक बारमध्ये फोन करून ...

Permission to order liquor from the bar itself, the wine shop is not mentioned in the order | बारमधूनच दारू मागविण्याची परवानगी, वाईन शॉपचा उल्लेख आदेशात नाही

बारमधूनच दारू मागविण्याची परवानगी, वाईन शॉपचा उल्लेख आदेशात नाही

Next

पुणे : महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवांसोबतच बार-रेस्टॉरंटमधून पार्सलद्वारे मद्य पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिक बारमध्ये फोन करून किंवा ॲपद्वारे मागणी करू शकतात. पुरवठ्याची व्यवस्था संबधित बारने करायची आहे. महापालिकेच्या नऊ एप्रिलपर्यंत आदेशात वाईन शॉपचा उल्लेख होता, परंतु बुधवारच्या आदेशात हा उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

ज्य उत्पादन शुल्क विभागाने 'एमआरपी'नुसारच मद्य पार्सल देण्याच्या सूचना बारचालकांना देण्यात आल्या आहेत. यासोबतच सोबत परमिट पास, ओळखपत्र आणि पुरवठा करण्यासाठी घरी जाणाऱ्याकडे नोकरनामा बाळगण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यासाठी संबंधित आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा जिल्हाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रासाठी आदेश काढतात. नागरिक विविध अॅपद्वारे किंवा थेट बारमध्ये दूरध्वनीद्वारे फोन करून आपली 'ऑर्डर' देऊ शकणार आहेत. ग्राहकाला मद्य विक्री करताना त्यांनी परमिट विकत घेणे आवश्यक आहे. यासोबतच नियम व निकषांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

ग्राहकांना मद्याचा पुरवठा पार्सलद्वारे करण्यात येत असल्याने व्यावसायिकांना स्टॉकची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने विक्रेत्यांना पुरवठा करण्यास परवानगी दिलेली आहे.

पुणे महापालिकेने ९ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार वाईन शॉपनाही होम डिलिव्हरीसाठी परवानगी असल्याचे म्हटले हाेते. त्याप्रमाणे गेले काही दिवस वाईन शॉपने होम डिलीव्हरी सुरूही केली होती. याबाबत पुणे जिल्हा वाईन शाॅप असोसिएशनचे सदस्य दीपक खैरे म्हणाले, आमच्या दुकानांना एकच शटर आहे. त्यामुळे होम डिलीव्हरीसाठी दुकान उघडल्यावर लगेच खूप गर्दी होते. त्यामुळे अनेक दुकानांना पोलिसांचा त्रास होतो. त्याचबरोबर पेट्रोलचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे कमी रकमेची डिलिव्हरी परवडत नाही. परंतु, अनेक जण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे डिलिव्हरी होत नाही, अशी तक्रारही करतात. दुसरे म्हणजे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच वेळ दिली असल्याने एखादी व्यक्ती काम संपवून घरी गेल्यावर त्याला ऑर्डर देता येत नाही.

-----

नागरिक बारमध्ये मोबाईल, लँडलाईनवर थेट फोन करून अथवा अॅपवरून मागणी कळवू शकतात. नागरिकांना हे पार्सल आणायला जाण्यास मनाई आहे. मात्र, बारचे कर्मचारी अथवा अॅपद्वारे हे पार्सल पोचविले जाणार आहे.

-----

Web Title: Permission to order liquor from the bar itself, the wine shop is not mentioned in the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.