बारामतीत पवार कुटुंबियांच्या दिवाळी सणाला सुरुवात; वसुबारस निमित्त केले गायींचे पूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 08:43 PM2020-11-12T20:43:05+5:302020-11-12T20:44:15+5:30

बारामतीत दिवाळी सणानिमित्त दरवर्षी पवार कुटुंब एकत्र येते...

Pawar family's Diwali celebrations begin in Baramati; Worship of cows on the occasion of Vasubaras | बारामतीत पवार कुटुंबियांच्या दिवाळी सणाला सुरुवात; वसुबारस निमित्त केले गायींचे पूजन

बारामतीत पवार कुटुंबियांच्या दिवाळी सणाला सुरुवात; वसुबारस निमित्त केले गायींचे पूजन

Next

बारामती : दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त होणारा पवार कुटुबियांच्या भेटीगाठींचा कार्यक्रम यंदा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पवार कुटुंबियांनी हा निर्णय जाहीर केला आहे. मात्र बारामतीत पवार कुटुंबियांची कौटुंबिक दिवाळी सणाला सुरु झाली आहे... 

बारामतीत दिवाळी सणानिमित्त दरवर्षी पवार कुटुंब एकत्र येते. यंदाचे वर्ष देखील त्याला अपवाद नाही. वसुबारस सणाच्या निमित्ताने बारामती अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमधील सेंटर फॉर एक्सलन्स इन डेअरीच्या फार्मवर गायींचे पूजन करण्याचा कार्यक्रम पार पडला.

मात्र, पवार कुटुंबियांची कौटुंबिक दिवाळी मात्र सुरु झाली आहे. गुरुवारी(दि १२) माळेगांव येथील अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमधील सेंटर फॉर एक्सलन्स इन डेअरीच्या फार्मवर प्रतिभा पवार,खासदार सुप्रिया सुळे,डॉ.रजनी इंदुलकर,सुनंदा पवार,शुभांगी पवार,कुंती पवार आदी महिलांनी एकत्र येत गायींचे पुजन केले.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खासदार सुळे यांच्यासह मास्क वापरण्याची दक्षता घेतल्याचे दिसुन आले.
दरम्यान फार्मवरील या केंद्रांत भारतीय पारंपारिक गायी तसेच जगभरातील वेगवेगळ्या प्रजातींच्या गायींवर मोठ्या प्रमाणात संशोधन केले जाते. वसूबारसच्या मुहूर्तावर नव्याने काही गायींचे आगमन झाले. त्यांचे देखील पूजन केल्याची माहिती खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोशल मीडियावर छायाचित्रांसह पोस्ट करत माहिती दिली. 

Web Title: Pawar family's Diwali celebrations begin in Baramati; Worship of cows on the occasion of Vasubaras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.