धक्कादायक घटना! पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या तब्बल ५० गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 02:39 PM2021-12-05T14:39:36+5:302021-12-05T14:39:45+5:30

आई वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे दिले नाहीत म्हणून पतीने माहेरच्या लोकांवरून टोमणे मारून शिवीगाळ व दमदाटीही केली

Over 50 Thyroid Pills Taken by Married Women | धक्कादायक घटना! पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या तब्बल ५० गोळ्या

धक्कादायक घटना! पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या तब्बल ५० गोळ्या

Next

पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. ते दिले नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. या छळाला कंटाळून विवाहितेने थायरॉईड आजारावरील तब्बल ५० गोळ्या खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पतीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. साने चौक, चिखली येथे सप्टेंबर २०१५ ते २ डिसेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी ३१ वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिचा पती अमोल मारुती भंडारे (वय ३७, रा. साने चौक, चिखली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचे आणि चारचाकी वाहनाचे कर्ज फेडण्यासाठी पतीने विवाहितेकडे त्यांच्या आई वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे दिले नाहीत म्हणून पतीने माहेरच्या लोकांवरून टोमणे मारून शिवीगाळ व दमदाटी केली. रात्री अपरात्री दारू पिऊन येऊन फिर्यादीला मारहाण करून उपाशी ठेवले. आरोपी पतीच्या या त्रासाला कंटाळून गुरुवारी (दि. २) विवाहितेने थायरॉईड आजारावरील ५० गोळ्या खाल्ल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Over 50 Thyroid Pills Taken by Married Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app