"दैव देते आणि केंद्र सरकार नेते.." ; पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाने पाठविले कांदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 04:20 PM2020-09-18T16:20:27+5:302020-09-18T16:24:12+5:30

शेतकरी टिकेल तर शेती पिकेल.. 

Onions was sent to Prime Minister Narendra Modi by the Nationalist congress party Women's in Pune | "दैव देते आणि केंद्र सरकार नेते.." ; पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाने पाठविले कांदे 

"दैव देते आणि केंद्र सरकार नेते.." ; पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाने पाठविले कांदे 

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने व्यक्त केला निषेध

पुणे (धायरी) : दैव देते आणि केंद्र सरकार नेते अशा घोषणा देत राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारलाकांदा पाठवून कांदा निर्यात बंदीचा निषेध व्यक्त केला. कोरोनासारख्या महामारीमुळे सर्वच जण संकटात आहेत. गारपीट, पाणीटंचाई, दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा उत्पादन घेतले, मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसने निषेध व्यक्त करीत आज पुण्यातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पंतप्रधानांना पोस्टाने कांदा पाठविला. 

कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. मुंबई जवळील उरण बंदरावर ५ लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे, जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे, हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण? तसेच देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान वल्गना करतात, त्याचवेळी ते शेतकरी विरोधात निर्णय घेतात, मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला.     

चाकणकर पुढे म्हणाल्या, राज्यपालांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिली तशीच वेळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना द्यावी व त्यांच्या अडचणी केंद्रापर्यंत पोहचवाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा भेट पाठवित आहोत. शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी.

Web Title: Onions was sent to Prime Minister Narendra Modi by the Nationalist congress party Women's in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.