बारामतीत एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद, पण परिसरात दहशत कायम  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:37 PM2020-01-30T12:37:41+5:302020-01-30T14:13:02+5:30

बारामती - बारामती तालुक्यात काटेवाडी, कण्हेरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे .मात्र ...

One leopard Catch in Baramati, but fear is continued in area | बारामतीत एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद, पण परिसरात दहशत कायम  

बारामतीत एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद, पण परिसरात दहशत कायम  

Next

बारामती - बारामती तालुक्यात काटेवाडी, कण्हेरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे .मात्र बिबट्यांची संख्या एकापेक्षा अधिक असल्याने दहशतीचे वातावरण कायम आहे.

बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील संतोष  जाधव या शेतकऱ्याच्या  शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज बिबट्या जेरबंद झाला.  या बिबट्याला मोठ्या पोलिस बंदोबस्तात बारामती येथे हलविण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून  बिबट्याने तालुक्यातील काटेवाडी , कण्हेरी, ढेकळवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील लकडी येथे शेळ्या मेंढ्यांची शिकार केली होती .त्याने आतपर्यंत सहा शेळ्या , मेंढी , कुत्र्याची शिकार केली आहे . 

दरम्यान , बिबट्याला बारामती एमआयडीसीतील वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात नेण्यात आले आहे .त्याला पाहण्यासाठी संपूर्ण काटेवाडी गाव लोटले होते .

Web Title: One leopard Catch in Baramati, but fear is continued in area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.