चालकाने थुंकण्यासाठी उघडलेला कारचा दरवाजा बेतला एकाच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 03:46 PM2019-10-18T15:46:08+5:302019-10-18T15:59:18+5:30

लासुर्णे येथे गंभीर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू..

one death due to driver opened door for spitting | चालकाने थुंकण्यासाठी उघडलेला कारचा दरवाजा बेतला एकाच्या जीवावर

चालकाने थुंकण्यासाठी उघडलेला कारचा दरवाजा बेतला एकाच्या जीवावर

googlenewsNext

लासुर्णे : इंदापूर-बारामती मार्गावर चालकाने थुंकण्यासाठी अचानक कारचा दरवाजा उघडल्यामुळे दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला आहे.लासुर्णे (ता.इंदापुर) येथील बोरी चौकात शुक्रवारी(दि.१८) सकाळी ११ च्या सुमारास हाअपघात घडला. मल्हारी सुखदेव गायकवाड (वय ५५) असे या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कारचालक पसार झाला आहे.रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कारचा दरवाजा उघडताना धक्का लागून गायकवाड खाली पडले. यावेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली गायकवाडयांचा जागीच मृत्यू झाला. इंदापूर- बारामती रस्त्यावर बारामतीच्या दिशेनेकार निघाली होती.यावेळी कार चालकाने अचानक आपल्या गाडीचा दरवाजा पाठीमागून पाहता उघडला. याचवेळी लासुर्णे (ता. इंदापूर) येथील कर्दनवाडीचे गायकवाड (वय ५५) हे आपल्या दुचाकीवरून येत होते.  उघडलेल्या दरवाजाचाधक्का लागल्याने खाली पडले. दरम्यान, इंदापूर दिशेने निघालेली एसटी बस(क्रमांक  एमएच १२ / इएफ ६६७०) च्या मागील चाकाखाली गायकवाड सापडल्यानेगंभीर अपघात झाला.यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गायकवाडयांच्या अपघातामुळे कर्दनवाडी व लासुर्णे परिसरात शोककळा पसरलीआहे.अपघातानंतर कारचालक पसार झाल्याने त्याची माहिती मिळाली नाही.
———————————

Web Title: one death due to driver opened door for spitting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.