'हिंदू' कांदबरीतील मजकुरावर आक्षेप, लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 03:28 PM2021-01-11T15:28:10+5:302021-01-11T15:29:28+5:30

भालचंद्र नेमाडे यांनी 'हिंदू' या पुस्तकात समाजाबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक मागे घ्यावे.

Objection to the text of Hindu novels, crime against writer Bhalchandra Nemade | 'हिंदू' कांदबरीतील मजकुरावर आक्षेप, लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत गुन्हा 

'हिंदू' कांदबरीतील मजकुरावर आक्षेप, लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत गुन्हा 

googlenewsNext

पिंपरी : हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीतील काही मजकुरावर आक्षेप घेत त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार ‘हिंदू’कार लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १०) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅड. रमेश खेमू राठोड (वय ३५, रा. शांती नगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकात नेमाडे यांनी लमाण समाजाच्या महिलांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यामुळे जाती व समाज यांच्यात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे.

अ‍ॅड. राठोड म्हणाले, भालचंद्र नेमाडे यांनी पुस्तकात समाजाबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ हे पुस्तक माघारी घ्यावे. तसेच नेमाडे यांनी लमाण समाजाची माफी मागावी. अन्यथा समाजातर्फे आंदोलन करण्यात येईल.

Web Title: Objection to the text of Hindu novels, crime against writer Bhalchandra Nemade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.