कोरोनातून बरे झाल्यावर दहा झाडे लावण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:51+5:302021-05-16T04:11:51+5:30

आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रेरणेने व राव-लक्ष्मी फाउंडेशनच्या सहकार्याने चौफुला (ता. शिरूर) येथे दहा ...

An oath to plant ten trees after healing from Corona | कोरोनातून बरे झाल्यावर दहा झाडे लावण्याची शपथ

कोरोनातून बरे झाल्यावर दहा झाडे लावण्याची शपथ

Next

आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रेरणेने व राव-लक्ष्मी फाउंडेशनच्या सहकार्याने चौफुला (ता. शिरूर) येथे दहा दिवसांपूर्वी २०० रुग्णांचे कोविड केअर सेंटर गणेश शेळके यांच्या मयूरी मंगल कार्यालयात प्रफुल्ल शिवले यांनी सुरू केले. पहिल्याच आठवड्यात १०० रुग्णांची भरती झालेल्या या सेंटरमध्ये सद्यस्थितीत १५० रुग्ण दाखल आहेत. महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, आंघोळीला गरम पाणी, योगोपचार, उत्तम नाष्टा, आयुर्वेदानुसार जेवण, करमणुकीसाठी स्क्रीनची सुविधा या सेंटरमधून आता रुग्ण बरे होवून घरी जावू लागल्याने जे रुग्ण सुरुवातीला ऑक्सिजनअभावी दाखल झाले होते त्यांना घरी जाताना त्यांनी आपल्या घरापुढे १० झाडांची लागवड, जोपासना करण्याची शपथ येथील आयुर्वेदिक उपचार करणारे डॉ. नवीन काळे व त्यांच्या पत्नी धरती काळे देत असून डिस्चार्ज घेतलेल्या पहिल्या रुग्ण वर्षा शिवले यांच्या निमित्ताने या उपक्रमाचा प्रारंभ झाला. दरम्यान या सेंटरमधील रिकव्हरी रेट जिल्ह्यातील सर्व सेंटरपेक्षा उत्तम व अल्पावधीचा असल्याची माहिती डॉ. भक्ती जयसिंगराव पाचर्णे यांनी दिली.

--

फोटो क्रमांक : १५ शिक्रापूर झाडे लावण्याची शपथ

फोटो - बऱ्या झालेल्या रुग्ण वर्षा शिवले यांना दहा झाडांचे वाटप करताना डॉ.नवीन व डॉ.धरती काळे दांपत्य

Web Title: An oath to plant ten trees after healing from Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.