" आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही ; आज आमची सत्ता आहे कधीतरी त्यांची येईल..! "

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 04:25 PM2020-11-27T16:25:32+5:302020-11-27T16:34:41+5:30

राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून हे सरकार इतक्य दिवसात पडेल तितक्या दिवसात पडेल याप्रकारची वक्तव्ये सातत्याने केली जात आहे...

"No one has come to power for life; Today we will have their power tomorrow ..! '' | " आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही ; आज आमची सत्ता आहे कधीतरी त्यांची येईल..! "

" आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही ; आज आमची सत्ता आहे कधीतरी त्यांची येईल..! "

Next

पुणे : महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र या वर्षभरात राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून हे सरकार इतक्या दिवसात पडेल तितक्या दिवसात पडेल याप्रकारची वक्तव्ये सातत्याने केली जात आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समाचार घेतानाच त्यांना सणसणीत टोला देखील लगावला आहे. 

पुणे पदवीधर निवडणुकीतील महविकास आघाडीच्या उमेदवार असलेले अरुण लाड यांच्या प्रचारार्थ त्या इंदापूर इथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आमची आहे कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही. परंतु, काही लोक सारखे सारखे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असे बोलत असतात. त्यांच्या बोलण्याची मला फार  गंमत वाटते. पण नेहमी रिकामी भांडीच जास्त आवाज करतात मात्र भरलेली भांडी अजिबात आवाज करत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.  

तुम्हाला पाहिजे तितका आवाज करा. आणि समजा आमचे महाविकास आघाडी सरकार पडले तर पुढे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. पण तूर्तास तरी आमचे सरकार स्थिर असून ते आपला कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल असा ठाम विश्वास देखील सुळे यांनी यावेळी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या..
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत असून ते कोरोनावरील लास निर्माण करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेली कोरोनावरील लस पुण्यात निर्माण होत आहे यापेक्षा राज्य सरकारचे मोठे दुसरे ते यश काय आहे. असे गौरवोद्गार काढतानाच सुळे यांनी मोदींनाही आता पुणे हवंहवंस वाटू लागले आहे, अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी केली. 


 

Web Title: "No one has come to power for life; Today we will have their power tomorrow ..! ''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.