स्थानिक पातळीवर कुणालाही कर्फ्यू लावता येणार नाही : जिल्हाधिकारी नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 08:04 PM2020-05-18T20:04:45+5:302020-05-18T20:12:18+5:30

जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवर कर्फ्यू लावता येणार नाही.

No curfew can be imposed at local level : Collector Naval Kishor Ram | स्थानिक पातळीवर कुणालाही कर्फ्यू लावता येणार नाही : जिल्हाधिकारी नवल किशोर राम 

स्थानिक पातळीवर कुणालाही कर्फ्यू लावता येणार नाही : जिल्हाधिकारी नवल किशोर राम 

Next
ठळक मुद्देकोणी असे निर्णय घेतल्यास कठोर कारवाई करणारसरपंच, गावातील काही ठराविक लोकांच्या आग्रहाखातर असे लॉकडाऊन जाहीरस्थानिक पातळीवर प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाचे आदेश नसताना आडमुठे निर्णय घेणे चुकीचेजिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर सुरु

पुणे : कोणत्याही भागात लॉकडाऊन, कर्फ्यू लावण्याचे अथवा वाढविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी अथवा सक्षम अधिकारी यांनाच आहे. जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायत अथवा, नगरपंचायत, नगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवर कर्फ्यु लावता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. या संदर्भांत सर्व यंत्रणांना स्पष्ट आदेश दिले आहे. स्थानिक पातळीवर कोणी असे निर्णय घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असे देखील स्पष्ट केले.


सध्या शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोनाच्या धास्तीने काही तालुक्यांमध्ये अनेक ग्रामपंचायती, नगरपालिका कोणी सात दिवस, कोणी पंधरा दिवस तर कोणी केवळ तीन दिवसांसाठी देखील संपूर्ण गाव, नगरपालिकांमध्ये कर्फ्यु लावला जात आहे. हा कर्फ्यु लावताना कोणतेही नियम लक्षात घेतले जात नाही, स्थानिक सरपंच, गावातील काही ठराविक लोकांच्या आग्रहाखातर असे लॉकडाऊन जाहिर केले जात आहे. परंतु यामुळे गावातील अथवा स्थानिक भागातील नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे. गावांच्या विरोधात जाण्याची कोणाची तयारी नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाने, नगरपालिकेने काळजी घेणे आवश्यक आहे. पण स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाचे आदेश नसताना आडमुठे निर्णय घेणे चुकीचे आहे.
जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले की, अशा प्रकारे एखाद्या गावाला किंवा, वाड्या, वस्ती अथवा नगरपालिकेला स्थानिक पातळीवर कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेता येणार नाही. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर सुरु केले आहेत. या सेंटरमध्येच संशयित  व्यक्तींना क्वारटाईन करण्याची सोय केली आहे.
--
गावा-गावांमधील स्वयंम घोषित क्वारंटाईन सेंटर धोक्याचे
सध्या मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागामध्ये अडकलेली लोक पुन्हा एकदा आपल्या गावांकडे जात आहेत. परंतु मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने या शहरांमधून येणा-या लोकांना गावांमध्ये गावांच्या बाहेर असलेल्या मंदीर अथवा शाळांमध्येच थांबविण्यात येत आहे. गावांकडून स्वयंम क्वारंटाईन सेंटरमध्ये मात्र आरोग्याची कोणत्याही स्वरुपाच्या सोयी नाही, एका ठिकाणी किती लोकांना ठेवायचे, अस्वच्छता, स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यामुळे सध्या गावांनी तायर केलेली स्वयंम घोषित क्वारंटाईन सेंटर धोक्याची घंटा ठरू शकते.

Web Title: No curfew can be imposed at local level : Collector Naval Kishor Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.