Pune Breaking News: पुणे शहरात पुन्हा 'नवा लॉकडाऊन' जाहीर : दुकानांना पूर्ण दिवस सवलत नाहीच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 10:39 PM2020-07-31T22:39:33+5:302020-07-31T22:47:18+5:30

हा नवा ‘लॉकडाऊन’ १ आॅगस्टच्या पहाटे १ वाजल्यापासून ते ३१ आॅगस्ट च्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

'New Lockdown' announced again in Pune city: No full day discount for shops | Pune Breaking News: पुणे शहरात पुन्हा 'नवा लॉकडाऊन' जाहीर : दुकानांना पूर्ण दिवस सवलत नाहीच 

Pune Breaking News: पुणे शहरात पुन्हा 'नवा लॉकडाऊन' जाहीर : दुकानांना पूर्ण दिवस सवलत नाहीच 

Next
ठळक मुद्देमॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सही ५ आॅगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगीअत्यावश्यक वस्तूंची दुकाने पी-१, पी-२ पध्दतीनेच सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली

पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी न होता वाढतच चालल्याने, राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेनेही आपली शहराकरिताची नवी नियमावली जाहिर केली आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ म्हणून जारी करण्यात आलेल्या या नव्या आॅर्डरमध्ये जुन्याच नियमावलीची री ओढण्यात आली आहे. हे करताना मोठी अपेक्षा असलेली पूर्ण दिवस सर्व दुकांनाना परवानगी मात्र देण्यात आलेली नाही. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बिगर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने पी-१, पी-२ पध्दतीनेच सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

दरम्यान मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सही ५ आॅगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यातील हॉटेल्स खुली ठेवण्यास परवानगी नाकारली असून, केवळ पार्सल सेवा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विवाह, विवाह सोहळ्या विषयी कार्यक्रम हे केवळ मोकळ्या जागेत हिरवळीवर किंवा वातानुकुलित यंत्रणा नसलेल्या हॉलमध्ये घेता येऊ शकणार आहेत. ही परवानगी देताना पूर्वीची उपस्थितीची मर्यादा मात्र पालिकेने नमूद केलेली नाही. 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश शुक्रवारी जाहीर केले असून, हा नवा ‘लॉकडाऊन’ १ आॅगस्टच्या पहाटे १ वाजल्यापासून (आजपासून) ३१ आॅगस्ट च्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. नव्या आदेशाप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रात (कंटन्मेंट झोन) मध्ये आता सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर सायंकाळी ५ ते सायंकाळी ६ पर्यंत किराणा दुकान, भाजीपाला, दुध विक्री व रेशन दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. 

या आदेशात ५ आॅगस्टपासून मोकळ्या मैदानात खेळावयाचे सांघिक खेळ वगळता आऊट डोअर बॅडमिंटन, नेमबाजी, टेनिस, जिम्नॅस्टिक, मल्लखांब यांना परवानगी देण्यात आली आहे.सल्यास ते घरेपाच सेवा किंवा नेहमीच्या पध्दतीनेप्रमाणे सुरू राहतील. सरकारी कार्यालयात कर्मचारी संख्येच्या जास्तीत जास्त १० टक्के अथवा १० व्यक्ती.

Web Title: 'New Lockdown' announced again in Pune city: No full day discount for shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.