NCP workers should campaign like Sangh volunteers; Sharad Pawar's advice | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांसारखा प्रचार करावा ;शरद पवार यांचा सल्ला 
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांसारखा प्रचार करावा ;शरद पवार यांचा सल्ला 

पुणे ; लोकसभा निवडणुकीच्या निकालाने खचून जाऊ नका, विधानसभेच्या कामाला लागा ,  विधानसभेला जास्तीत जास्त नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाईल, त्यासाठी आतापासूनच मतदारांच्या घरी पोहचा, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार निवडून यायला हवेत, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. मात्र याचे उदाहरण समजावून सांगताना संघाचे स्वयंसेवक कसे प्रचार करतात याचे उदाहरण देण्यासही ते विसरले नाहीत. 

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विभागवार बैठका घेण्यास पवार सुरुवात केली आहे. आज त्यांनी पुण्यातील भोसरीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.पवार म्हणाले की, आतापासूनच मतदारांना घरोघरी जाऊन भेटायला हवं. असं भेटलात, तर ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत.केल्याचे मानले जात आहे.संघाचे स्वयंसेवक सकाळी एखाद्या घरी गेले आणि ते घर बंद असेल तर संध्याकाळी जातात. तेव्हा संबंधित व्यक्ती भेटली नाही ते दुसऱ्या दिवशी जातात पण संबंधितांना भेटतातच. त्यांचे विचार पटले नाहीत तरी चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात असं सांगायलाही ते विसरले नाहीत. इतकेच नव्हे तर संघाच्या कार्यशैलीत भाजपचे यश सामावले असल्याची माहिती एका भाजप खासदाराने दिल्याचेही त्यांनी सांगितले. 


Web Title: NCP workers should campaign like Sangh volunteers; Sharad Pawar's advice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.